टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये आज (ता. 24) सायंकाळी सामना होत आहे. सामन्याचा क्षण जसजसा जवळ येत आहे, तसतशी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पाक संघाने एक दिवस आधीच आपला अंतिम संघ जाहीर केला. मात्र, टीम इंडियाने आपला अंतिम संघ जाहीर केला नव्हता. त्यामुळे अंतिम संघात नेमका कोणाचा समावेश होणार, याबाबत चाहत्यांमध्ये दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
दरम्यान, भारत-पाक सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने (Virat Kohali) माध्यमांसोबत चर्चा केली. तो म्हणाला, की “पाकिस्तान संघ खूप मजबूत आहे. तसा तो नेहमीच राहिला आहे. आतापर्यंत चांगल्या प्रदर्शनामुळे भारत आयसीसी स्पर्धांमध्ये अजिंक्य राहिला आहे.”
टीम इंडियात कोणाचा समावेश..?
टीम इंडियात कोणा-कोणाचा समावेश असेल, या प्रश्नावर विराट म्हणाला, की “आमच्या संघात खूप चांगले संतुलन आहे. आम्हाला हेही चांगल्या प्रकारे माहीत आहे, की मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कोणते 11 खेळाडू घेऊन उतरायचे आहे, पण या गोष्टीचा खुलासा आम्ही आता करू शकत नाही…”
“आम्ही याआधी काय केलेय, याची कधीच चर्चा करीत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे लक्ष विचलित होते. तुम्ही कशाप्रकारे तयारी करता, सामन्याच्या दिवशी कशाप्रकारे क्रिकेट खेळता, हे महत्वाचे आहे..” असे विराटने स्पष्ट केले..
पाकिस्तानचा संघ खूप मजबूत..
तो म्हणाला, की “पाकिस्तानचा संघ माझ्या हिशेबाने खूप मजबूत आहे. त्यांच्या विरोधात तुम्हाला नेहमीच सर्वश्रेष्ठ क्रिकेट खेळावे लागेल. पाकिस्तानकडे खूप टॅलेंट आहे. त्यांच्याकडे असे खेळाडू आहेत, जे सामन्याची दिशा बदलू शकतात.”
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511