SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात पहिली ते चौथीपर्यंतच्याही शाळा सुरु होणार..? शिक्षणमंत्री म्हणतात, या तारखेला वाजणार घंटा..!

कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने राज्यातील विविध आस्थापने, शाळा-महाविद्यालये, मंदिरांची दारे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली केली आहेत. देशभरात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे.

दरम्यान, लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता देण्यात आली असून, लवकरच लहान मुलांचेही लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्यातील सरसकट (पहिली ते चौथीपर्यंत) शाळा सुरु करण्याची चर्चा सुरु झाली आहे.

Advertisement

सध्या राज्यात पाचवी ते बारावी आणि महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यानंतर आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्गही सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुले शाळेपासून दूर आहेत. सध्या त्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असले, तरी त्याचा म्हणावा तसा परिणाम होताना दिसत नाही. आता आणखी काही काळ मुले शाळेपासून दूर राहिल्यास त्याचा त्यांच्या भावी आयुष्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

लहान मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आता शाळा सुरु करण्याची गरज आहे. कोरोना संसर्ग नसलेल्या अनेक गावांमध्ये शाळा सुरु झाल्या आहेत. मुलेही वर्गात येऊन बसत आहेत. विशेष म्हणजे, पालकांनीही आता शाळा सुरु करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.

‘सीईओं’कडून हिरवा कंदिल
या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची (सीईओ) काल (शुक्रवारी)बैठक घेतली. राज्यातील सरसकट शाळा सुरु करण्यास सर्व अधिकाऱ्यांनीही हिरवा कंदिल दाखवला.

Advertisement

सर्व जिल्हा परिषदांच्या सीईओंनी पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरु करण्यास संमती दर्शविल्याने या निर्णयाचा चेंडू आता मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या कोर्टात गेला आहे. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे शाळेबाबत निर्णय घेऊ शकतात.

दिवाळीनंतर शाळा सुरु होणार?
कदाचित दिवाळीनंतर शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, की “राज्यातील बहुतेक सर्वच ‘सीईओं’नी पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा आग्रह धरला. पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेतली गेली आहे.”

Advertisement

आता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करतानाही काय काळजी घ्यावी लागेल, याबाबत अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय घेतील. शिक्षण विभागाचे अधिकारी, विविध संस्थाचालकांशीही मी लवकरच चर्चा करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement