SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लिक कशी होते? आर्यन खान प्रकरणात चॅट कशी आली समोर, जाणून घ्या..

व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट एन्ड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याचं बऱ्याचदा व्हॉट्सअ‍ॅपने सांगितलं आहे. एंड-टू-एंड एन्क्रिप्शन म्हणजे मेसेज पाठवणारा व ज्याला मेसेज पाठवला तो वगळता इतर कुणालाही ती चॅट वाचता येणार आहे. कोणीही मेसेज वाचू शकत नाही. म्हणजे खुद्द व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा वाचू शकत नाही, असं व्हॉट्सअ‍ॅप सांगतं.

आता प्रश्न उद्भवतो की, प्रत्येक वेळी बॉलिवूडसारख्या प्रकरणाशी संबंधित वाद असताना, संबंधित व्यक्तीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक होतात आणि तपासात एखादी चॅट अधिकार्‍यांपर्यंत पोहोचते कसे? तुम्हाला बॉलिवूड सेलिब्रिटींच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याच्या कित्येक गोष्टी कानी पडल्या असतील.

Advertisement

सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्याचा रिया चक्रवर्तीशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप चॅट इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. आता सध्या ड्रग्जबद्दल अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले आहे. ही सर्व प्रकरणे पाहता, प्रश्न उद्भवतो की व्हॉट्सअ‍ॅप मेसेज खरोखरच एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत का? तसेच प्रश्न असा आहे की हे बोलणं कसे लीक होते किंवा इतरांपर्यंत पोहोचते? चला, याविषयी जाणून घेऊया

एन्ड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅट कशा बाहेर येतात?

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असते तर एखाद्या प्रकरणात या चॅटला एक्सेस केले जाते, पाहू. पहिला मार्ग हा आहे की, तुमचा फोन अनलॉक करून तपास अधिकाऱ्यांना सोपवावा लागतो. एकदा अनलॉक झाल्यावर, सर्व चॅट सहज उपलब्ध होतात. त्याचे स्क्रीनशॉट घेतले जाऊ शकतात किंवा ते कॉपी केले जाऊ शकतात, कोणाशीही शेअर केले जाऊ शकतात.

भारतातील कायदा स्मार्टफोन सारख्या अत्यंत वैयक्तिक गोष्टींबद्दल नेमका स्पष्ट नाही. बाहेरील देशांमध्ये, फोन किंवा कॉम्प्युटरवर जप्ती आणण्यापूर्वी किंवा शोधायचे असल्यास पोलिसांना वॉरंट आवश्यक असते. कधीकधी कोणता मोबाईल अनलॉक होत नाही, मग तेव्हा फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जाते.

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करताना चॅट एन्क्रिप्ट केले जातात, परंतु काही आठवड्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅप गूगल ड्राइव्ह किंवा आयक्लाऊडवर चॅटचा बॅक अप घेत होते. तुम्हालाही माहीत व्हायला हवं की, हे चॅट बॅकअप एन्क्रिपटेड नसते. म्हणून विशिष्ट पद्धती वापरून चॅट लिक होते. तपास यंत्रणांना न्यायालयाच्या आदेशाने Google आणि Apple शी संपर्क साधण्याचा आणि त्यांच्याकडून चॅट बॅकअप मिळवण्याचा पर्याय आहे. या बॅकअपची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केली जाऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप तपास अधिकाऱ्यांना डेटा शेअर करू शकते का?

Advertisement

तपास अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत वापरकर्त्याच्या खात्याशी संबंधित नोंदी शेअर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपशी कॉन्टॅक्ट करू शकतात. प्रोफाईल फोटो, ग्रुप माहिती, संपर्क माहिती इत्यादी कोणत्याही खात्याच्या स्टोअर सामग्रीमध्ये उपलब्ध आहेत. तपास अधिकाऱ्यांनी डेटाची मागणी केल्यानंतर, लागू कायदा आणि धोरणाच्या आधारावर विचार केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप यासंदर्भात माहिती देऊ शकते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या FQ पेजवर कुठेही असे म्हटले नाही की, मेसेजिंग अ‍ॅप कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांसह सामग्री शेअर करु शकते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement