आपल्या सर्वांनाच कोणती ना कोणती केशरचना आहे, जी स्वतःला खूप आवडते. आजकालच्या जगात आता पुरुषही फॅशनमध्ये वा लुक चांगला करण्यासाठी मागे नाहीत. आपल्याला सुंदर केस असावेत, आपली केशरचना आकर्षक असावी असं प्रत्येकाला वाटतं आणि ती का असू नये ? स्त्रियांचे सौंदर्य हे केसांवर जास्त अवलंबून असते. स्त्रियांना तर पाण्याच्या खराब असल्याने किंवा सततच्या शॅम्पू वापरल्याने क्वचित केसांच्या समस्या येतात.
सध्या अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या धावपळीत वाढता ताण-तणाव, व्यसने आणि चुकीच्या सवयी आणि अवेळी जेवणाची सवय आणि फास्ट फूड वगैरे अशाने धूळ व प्रदूषण इ.सारख्या बाह्य गोष्टींमुळे आजच्या काळात केस गळणे अत्यंत सामान्य झाले आहे. म्हणूनच काही वय गेल्यानंतर टक्कल पडण्याचं प्रमाणही वाढतं.
टक्कल पडण्याची कारणे काय असू शकतात?
▪️ आहारात वाढलेली साखर, मग ती पॅकेज केलेले अन्न असो किंवा प्रक्रिया केलेले अन्न
▪️ उच्च-ग्लायसेमिक वाढता आहार, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो आणि केस गळणे वाढू शकते.
▪️ केसवाढीसाठी व पोषण मिळण्यासाठी कोणत्या व्हिटॅमिनची गरज असते हे गुगलवर सर्च करून माहीती घ्या. त्या आवश्यक तपासणी न केल्याने काही व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुमचे केस गळू शकतात.
▪️ तुम्ही जी दैनंदिन जीवनशैली जगता त्याचा तुमच्या थायरॉईडवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे लवकर टक्कल पडू शकते.
▪️ आजकाल फिट राहण्यासाठी, रक्ताभिसरण चांगलं होण्यासाठी योगाकडे लक्ष द्या. जिम करत असताना प्रोटीन पावडर केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते.
आपल्या डोक्यावरील हळूहळू पाठीमागे सरकणारी हेअरलाईन आणि टाळूवरील केस गायब होणे, ही एक मोठी समस्या बनली आहे. स्त्रियांमधील केस गळतीमागे बरेच अनेकदा उपाय आणि कारणे सुचवली जातात, पण पुरुषांच्या टक्कल पडण्याकडे कोणी लक्ष देत नाही, असं जाणवतं. विशेषत: लहान वयात टक्कल पडलं तर तेव्हाच आपण काळजी घेऊन टक्कल का पडलं हे शोधणंही आवश्यक आहे. पूर्वीचे पुरुष त्यांच्या 50-60 वयात या समस्येला सामोरे जात असत. पण आता लहान वयात पुरुषांचा टक्कल पडणे हे हळूहळू वाढत चाललं आहे. 20 ते 30 वर्ष वयोगटातील पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची कारणं समजून घेण्याची गरज आहे.
टीप: लवकर टक्कल पडण्यावर उपचार करण्यासाठी काही योग्य बदल करा. जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील आणि कोणतीही सुधारणा जाणवत नसेल तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511