SpreadIt News | Digital Newspaper

फेसबुकवर ‘या’ कारणामुळे तुम्हालाही बसू शकतो लाखोंचा फटका; कसा ते जाणून घ्या..

भारतात फेसबुक (Facebook) वापरणाऱ्यांची संख्या तब्बल 34 कोटीच्या वर आहे. इंटरनेटच्या या जगात सोशल मीडियावरील अनेक प्रोफाईलवर आपण ‘ब्ल्यू टिक’ बघतो. हे बघून अनेकांना आपल्या प्रोफाईलवर ‘ब्ल्यू टिक’ असावी, अशी इच्छा असते.

ही ‘ब्ल्यू टिक’ म्हणजे त्या व्यक्तीचं सोशल मिडिया प्रोफाईल व्हेरीफाईड (Verified) असून, त्यांचं समाजात मानाचं स्थान आहे, तो प्रतिष्ठित व्यक्ती आहे. असा त्याचा अर्थ मानला जातो. त्यामुळेच अनेक जण सोशल मिडिया प्रोफाईलवर ‘ब्लू टिक’साठी शॉर्टकटचाही अवलंब करतात.

Advertisement

‘ब्ल्यू टिक’ आणि दलाल यांचा संबंध

काही घटनांवरुन असंत लक्षात येतं, की ‘ब्ल्यू टिक’ (Blue Tick) मिळवून देण्यासाठी सोशल मीडियावर दलालही सक्रीय झाले आहेत. देशभरातील ऑनलाइन इंग्लिश पोर्टल्सवर लिखाण प्रकाशित करू असे सांगून दलाल यूजर्सचे लॉगिन, पासवर्डही मागतात. हे दलाल कामाची रक्कम ॲडव्हांसमध्ये मागतात.

Advertisement

काही आमची कंपनी असल्याचंही सांगून लुबाडतात. यामुळे ‘ब्ल्यू टिक’ मिळविण्याचा प्रयत्न केल्यास कायमस्वरूपी ब्लॉक होण्याची तसेच आर्थिक फसवणूक होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. हे दलाल कमी वेळात ‘ब्ल्यू टिक’ मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या यूजर्सना 10-20 हजार रुपयांपासून 1 लाखांपर्यंतची रक्कम घेऊन फसवतात.

फेसबुकवर व्हेरीफिकेशन मिळविण्यासाठी..

Advertisement

▪️अकाउंटच्या हेल्प सेन्टर मध्ये जाऊनही तुम्ही हे करू शकता किंवा फक्त पुढील लिंकवर एकदा क्लिक करा 👉 https://m.facebook.com/help/1288173394636262?helpref=search&sr=3&query=blue

▪️ How do I request a verified badge? वर क्लिक करा.

Advertisement

▪️मग त्या पेजवर खाली येऊन निळ्या शब्दात – ‘a contact form’ असं लिहिलं असेल, त्यावर क्लिक करा आणि फॉर्म भरा.

▪️ आपलं फेसबुक प्रोफाईल स्वतःचं असल्यास किंवा फेसबुक पेज असल्यास तशी निवड करा.

Advertisement

▪️ आपली वैयक्तिक व फेसबुक अकाउंट संबंधी माहिती भरावी लागेल.

▪️ यानंतर फेसबूक आपले डॉक्युमेंट्स तपासून ब्ल्यू टिकविषयी निर्णय घेईल.

Advertisement

‘ब्ल्यू टिक’ मिळविण्यासाठी…

फेसबुकच्या नियमानुसार, नियमित चांगल्या, समाजहितासाठीच्या पोस्ट, लेखनामध्ये सातत्य, मोठ्या प्रमाणात असलेले फॉलोअर्स, लोकांकडून मिळणारी दाद, हेच यूजर ‘ब्ल्यू टिक’ मिळवण्यासाठी पात्र ठरतात. यूजर्सने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविणे, ऑनलाइन जनसंपर्क वाढविणे ही सोपी पद्धत आहे. फेसबुकचा फॉर्म ऑनलाईन भरून द्यावा लागतो. धार्मिक, अतिरेकी विषयांची पोस्ट प्रोफाईलमध्ये असल्यास ‘ब्लू टीक’ मिळत नाही. कोणतीही सोशल मीडिया कंपनी ऑफर देत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement