SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

TET: टीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेला परीक्षा होणार..

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी-2021) वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या आधीच्या वेळापत्रकानुसार 30 ऑक्टोबर रोजी होणारी ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार आता 21 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार (TET Exam 2021 Postponed) आहे.

राज्यात 30 ऑक्टोबर 2021 रोजी टीईटी TET म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यादिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 च्या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे.

Advertisement

टीईटी परीक्षेच्या तारखांचा खेळ…

टीईटी परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार होती; मात्र त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आल्याने टीईटी परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे.

Advertisement

31 ऑक्टोबरच्या दिवशी या आधीच पुढे ढकललेली आरोग्य विभागाची परीक्षा आल्याने 31 ऑक्टोबर ऐवजी टीईटी परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्याचे सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले होते.

मात्र, आता देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीमुळे ती तारीख पुन्हा बदलून 21 नोव्हेंबर करण्यात आली आहे, त्यामुळे उमेदवारांनी सतत परीक्षेची तारीख बदलत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

आता ‘असं’ असेल वेळापत्रक

▪️ प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे : 26 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर
▪️ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक : 21 नोव्हेंबर (वेळ : सकाळी 10.30 ते दुपारी 1)
▪️ शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-दोन : 21 नोव्हेंबर (वेळ : दुपारी 2 ते सायंकाळी 4.30)

Advertisement

डी टी एड, बी एड स्टुडंट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष मगर म्हणाले की, वारंवार TET परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याने प्रशासनाचे ढिसाळ नियोजन असल्याचं समोर येत आहे. परिणामी उमेदवारांची मानसिकता खराब होत आहे. सरकार उमेदवारांच्या भावनेशी खेळत असून उमेदवारांना सातत्याने मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे”, असं ते म्हणाले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement