SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रणवीर-दीपिका आयपीएलचा नवा संघ खरेदी करणार..? किती पैसे मोजावे लागणार, वाचा..

इंडियन प्रीमियर लीग.. अर्थात आयपीएल.. जगातील सर्वात मोठी स्पर्धा. आयपीएलचा 14 वा हंगाम नुकताच युएईमध्ये पार पडला. त्यात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद मिळविले. यंदाच्या हंगामात एकूण 8 संघ या स्पर्धेत उतरले होते. मात्र, 15 व्या हंगामात 10 संघ मैदानात दिसणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आधीच जाहीर केल्यानुसार, आयपीएल-2022 मध्ये आणखी दोन संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या दोन नवीन संघांसाठी 25 ऑक्टोबरला दुबईमध्ये बोली लावली जाणार आहे.

Advertisement

आयपीएल नि बॉलिवूडचं नातं तसं जूनंच. शाहरूख खान (Shahrukh khan) व जुही चावला (Juhi Chawla) यांच्या कोलकाता नाईट नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) टीमनं आतापर्यंत दोन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावलंय.

प्रीती झिंटाची पंजाब किंग्ज पहिल्या सीझनपासून ‘आयपीएल’मध्ये खेळत आहे. त्यानंतर बाॅलिवूडमधील आणखी एक नाव आयपीएल टीम खरेदी करण्यासाठी इच्छूक असल्याचे समोर येतंय. हे स्टार कपल म्हणजे, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone)..

Advertisement

‘आयपीएल’ टीम खरेदी करण्यासाठी रणवीर-दीपिका इच्छूक असून, दुबईत होणाऱ्या बोलीसाठी ते सामील होणार असल्याचे समजते. भारतातील दिग्गज अदानी ग्रुप (Adani Group) अहमदाबाद येथून संघासाठी बोली लावणार आहे.

दीपिका-रणवीर हे दोघंच नव्या टीमसाठी बोली लावणार, की त्यांच्यासोबत अन्य भागीदार आहेत. तसंच ते कोणत्या शहराच्या टीमसाठी बोली लावणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही..

Advertisement

किती पैसे मोजावे लागणार..?
‘बीसीसीआय’ने या नवीन संघांची मूळ किंमत 2000 कोटी रुपये निश्चित केलीय. किमान 3000 कोटींची वार्षिक उलाढाल असलेली कंपनी नवीन संघांसाठी बोली लावू शकते. ‘बीसीसीआय’ला नवीन फ्रँचायझीकडून सुमारे 7000 ते 10,000 कोटी रुपये अपेक्षित आहेत.

कोणत्या शहरांच्या नावे संघ..?
दरम्यान, ‘आयपीएल-2022’ मध्ये दोन नवीन फ्रँचायझींसाठी धर्मशाला, गुवाहाटी, रांची, लखनौ, अहमदाबाद आणि कटक अशा सहा शहरांची निवड बीसीसीआयने केली होती. मात्र, अहमदाबाद व लखनऊ या शहरांची नावे समोर येत असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement