SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘द स्क्विड गेम’ वेबसीरिजपासून लहान मुलांना दूरच ठेवा, या कारणांमुळे बसू शकतो मोठा फटका..

सध्या ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वर एक वेबसीरिज अक्षरक्ष: धुमाकूळ घालत आहे.. ‘द स्क्विड गेम’ (The Squid Game) असे या वेबसीरिजचे नाव आहे. अवघ्या महिन्याभरात १३ कोटींहून अधिक ‘व्हूज’ मिळालेल्या या वेबसीरिजने भारतीयांनाही शब्दश: वेड लावलंय…

‘द स्क्विड गेम’ ही एक दक्षिण कोरियन क्राईम वेबसिरीज.. ती विविध भाषांत आली नि प्रचंड लोकप्रिय झाली.. इतकी की अनेक तरुण या सीरिजचे ‘वॉलपेपर्स’ आपल्या स्मार्टफोनवर ठेवू लागले आहेत. तुम्हीही असे करीत असाल, तर थांबा.. सायबर चोर तुम्हाला लुटायला टपले आहेत.

Advertisement

‘द स्क्विड गेम’ या वेबसीरिजची लोकप्रियता पाहून, सायबर चोरांनी अनोखी युक्ती लढवली आहे. त्यांनी स्मार्टफोनमधील ‘गुगल प्ले स्टोअर’वर ‘स्क्विड गेम फोन वॉलपेपर अ‍ॅप’ उपलब्ध करून दिले आहेत. त्या माध्यमातून हे गुन्हेगार मालवेअर (Malware) प्राप्त करीत आहेत.

सध्या ‘स्क्विड गेम’शी संबंधित 200 पेक्षा अधिक अनधिकृत अ‍ॅप्स ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध आहेत. कोणतीही परवानगी नसताना, केवळ 10 दिवसांत सुमारे 10 लाखांपेक्षा अधिक वेळा हे अ‍ॅप ‘इन्स्टॉल’ करण्यात आल्याचे समोर आलेय. त्या माध्यमातून अनेकांना गंडा घालण्यात आलाय..

Advertisement

‘फोर्ब्ज’च्या वृत्तानुसार, ‘गुगल’ने शोध घेण्यापूर्वी हे ‘स्क्विड गेम वॉलपेपर’ 4K HD अ‍ॅप किमान 5 हजार वेळा डाउनलोड केल्याचे समोर आलेय. आता गुगलने हे अ‍ॅप्स ‘प्ले स्टोअर’वर ब्लॉक केले आहेत.

‘ईएसईटी’ अँड्रॉइड सुरक्षा संशोधक लुकास स्टेफान्को यांनी अ‍ॅपला ‘स्क्विड गेम’ थीम असलेलं अँड्रॉइड जोकर (Jocker) असं म्हटलंय. ‘जोकर’ नावाचा हा मालवेअर सर्वाधिक धोकादायक आहे. 2017 मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता..

Advertisement

‘दी स्क्विड गेम’ सीरिजच्या आवडीमुळे कोणीही असे अ‍ॅप इन्स्टाॅल करु नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा अनोळखी अ‍ॅप्सवरून स्मार्टफोनवर वॉलपेपर डाउनलोड केला असल्यास वेळीच सावध होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

‘स्क्विड गेम’मध्ये नेमकं काय..?
दक्षिण कोरियन क्राईम वेबसिरीज असून, त्यात एकूण नऊ एपिसोड आहेत. त्यातील मुख्य पात्रांवर मोठे कर्ज आहे. आपले आयुष्य बदलण्यासाठी त्यांना एका गेम खेळण्यासाठी आमंत्रित केले जाते. गेम जिंकणाऱ्यास मुबलक पैसा मिळेल, पण हरल्यास मृत्यू होईल.

Advertisement

आपली गरिबी दूर करण्यासाठी अनेक जण हा गेम खेळण्याचे आमंत्रण स्वीकारतात. त्यानंतर सुरु होताे, रक्तरंजीत खेळ.. कमकुवत मनाच्या लोकांसाठी ही वेबसीरिज नाही. त्यात प्रचंड हिंसा आहे.. पण थ्रिलर, सस्पेन्स, ट्विस्ट आणि ॲक्शन वेबसीरिज आवडत असल्यास सीरिज पाहू शकता..

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement