SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

प्रेरणादायक: पिझ्झा डिलीवरी बॉयने सुरु केली स्वतःची कंपनी; आज कमावतोय करोडो रुपये!

आपल्यातले बरेच लोक नोकरी गमावल्यानंतर बरेच लोक तणावाखाली जातात आणि धैर्य गमावतात. पण ही कथा एका व्यक्तीची आहे ज्याने नोकरी गमावल्यानंतर त्याच्या मनाचे ऐकले आणि स्वतः.आज एक मोठा उद्योगपती झाला.

वाचा प्रेरणादायक स्टोरी

Advertisement

सुनील पूर्वी पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा. पण एक दिवस त्याची नोकरी गेली. यानंतर सुनीलने आपले डोके लावले. आणि फ्लाइंग केक्स नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. आज अनेक राज्यांतील लोक फ्लाइंग केक्सच्या आउटलेटवर बनवलेल्या केकचा आनंद घेत आहेत. त्याची वार्षिक उलाढाल 8 कोटी रुपये आहे.

ही कहाणी आहे सुनील वसिष्ठ यांची. गरीब आर्थिक परिस्थितीमुळे सुनील केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेऊ शकला. सुनीलने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. मग त्याला कुरियर डिलीव्हरी बॉय म्हणून काम केले तर कधी पिझ्झा डिलीव्हरी बॉय म्हणून काम करावे लागले.

Advertisement

उद्योजक सुनील सांगतात की, 1991 मध्ये त्यांनी दिल्लीतील डीएमएसच्या बूथवर दुधाची पाकिटे वाटण्याचे अर्धवेळ काम केले, या नोकरीसाठी त्यांना महिन्याला 200 रुपये पगार मिळायचा. काही दिवस काम केल्यानंतर सुनीलने पुढील अभ्यास करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने कॉलेजला प्रवेश घेतला. पण अभ्यासासोबतच त्याला नोकरीही करावी लागली. एका कंपनीमध्ये सुनील कुरिअर वितरणाचे काम करू लागला. कुरिअर कंपनीत अडीच वर्षे काम केले. मग कंपनी बंद झाली आणि तो बेरोजगार झाला. त्यानंतर त्याने पिझा डिलिव्हरी करण्याचे काम सुरु केले. यांदरम्यान त्याच्या पत्नीच्या डिलिव्हरीच्या दरम्यान त्याला सुट्टी मिळाली नाही. त्याने आपले काम आपल्या ज्युनिअर कडे सोपवले अन तो निघून गेला. त्यानंतर त्याला कामावरून काढले.

मित्राकडून पैसे उधार घेतले आणि..

Advertisement

नोकरी सोडल्यावर सुनीलचे आयुष्य बदलले. नोकरी सोडल्यानंतर त्याने आपले स्वतःचे काम सुरु करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुनीलने जेएनयूसमोर काही पदार्थांचे स्टॉल लावले. काही काळानंतर त्या रस्त्यावरील ते दुकान लोकांनी बेकायदेशीर म्हणून तोडले. दरम्यान, सुनीलला कळले की, कॉल सेंटर उद्योग सध्या नोएडामध्ये चांगला चालला आहे. अनेक MNCs देखील आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांचे वाढदिवस धूमधडाक्याने साजरे करतात आणि केक, पिझ्झा, बर्गर, पेस्ट्रीज अशा ऑर्डर देत राहतात.

सुनीलने झपाट्याने वाढणाऱ्या नोएडामध्ये केकचे दुकान उघडण्याची संधी सोडली नाही आणि 2007 साली एका मित्राने दिलेल्या उधारीच्या पैशाने नोएडाच्या शॉप्रिक्स मॉलमध्ये दुकान उघडले. ‘फ्लाइंग केक्स’ असे या दुकानाचे नाव आहे. लोकांना त्याने बनवलेले ताजे केक आवडायला लागले आणि लवकरच त्याच्या केकची मागणी वाढू लागली. त्यानंतर सुनीलला छोट्या खाजगी कंपन्यांकडून केक ऑर्डर मिळू लागल्या आणि काम पुढे गेले. आज अनेक फ्रँचायझी आणि फ्लाइंग केक्सची दुकाने उघडली आहेत आणि आज तो वार्षिक उलाढाल 8 कोटींपेक्षा जास्त करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement