SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : उत्तम वाचन होईल. घरातील कामात अडकून जाल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. आज आपण धार्मिक कार्य, पूजा- अर्चा यांत मग्न राहाल.

Advertisement

वृषभ (Taurus) : धार्मिक स्थळाच्या भेटीने आनंद मिळेल. कामाची धांदल उडवून घेऊ नका. मित्रांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. वेळ काढावा लागेल.

मिथुन (Gemini) : चांगले साहित्य वाचनात येईल. कुटुंबियांसमवेत वेळ चांगला जाईल. तब्बेत चांगली राहील. आज खूप जपून राहण्याचा सल्ला देत आहेत.

Advertisement

कर्क (Cancer): घरात समजुतीने वागा. अधिकार वाणीने बोलाल. जबाबदारी झटकू नका. दिवसभरात काही लाभही होतील.बोलण्यात स्पष्टता ठेवून बोलाल.

सिंह (Leo) : आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. तब्बेतीकडे लक्ष द्या. तब्बेत बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. सूर्याला नमस्कार करा.

Advertisement

कन्या (Virgo): कामाच्या ताणामुळे थकवा जाणवेल. हातातील कामे प्रामाणिकपणे व सचोटीने करावीत. सामाजिक व अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल.

तूळ (Libra) : अति विचारात वेळ वाया घालवू नका. आवडीवर पैसे खर्च कराल. जोडीदाराच्या मताचा आदर करा. गैरसमजापासून दूर रहा.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : सामाजिक बांधीलकी जपा. उगाचच मन खिन्न होऊ शकते. भारी वस्त्रे आणि अलंकाराची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल.

धनु (Sagittarius) : व्यवहारी दृष्टीकोन ठेवावा. दिवसाची सुरुवात आळसात घालवू नका. विचारपूर्वक कार्य करा. मानसिक शांतता लाभेल.

Advertisement

मकर (Capricorn) : भागीदारांबरोबर चांगले संबंध राहातील. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. ओळखीच्या व्यक्तीची मदत होईल. जोडीदाराच्या इच्छेचा आदर कराल.

कुंभ (Aquarius) : घरातील सुखा-समाधानाचे वातावरण आपला आनंद वाढीस लावेल. घरातील वातावरण शांत असेल.

Advertisement

मीन (Pisces) : कामातून अपेक्षित लाभ होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन योजनांवर काम चालू कराल. कामाच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य मिळेल.

Advertisement