शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूक करायला अनेक जण उत्सुक असतात, मात्र कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, असा प्रश्न असतो. अनेक जण एक्सपर्टचे सल्ले घेतात, तर काही मोठमोठ्या गुंतवणूकदारांच्या सल्ल्यानुसार ट्रेड करीत असतात.
शेअर बाजारातील ‘बिग बुल’ अर्थात राकेश झुनझुनवाला हे कुठं पैसे गुंतवतात, यावर अनेकांचे लक्ष लागलेले असते. कारण राकेश झुनझुनवाला ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात, तो शेअर गुंतवणुकदारांना मालामाल करुन देतो, अशी त्यांची ओळख आहे.
राकेश झुनझुनवाला यांनीही अवघ्या 5 हजार रुपयांपासून शेअर बाजारात गुंतवणूक सुरु केली होती. मात्र, आज कोट्याधिशांच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते. राकेश झुनझनवाला यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनध्ये केलेल्या गुंतवणुकीवर एका महिन्यात 12 ते 20 टक्के परतावा मिळाला आहे.
राकेश व त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियाेमध्ये असलेल्या 5 शेअर्सने गेल्या वर्षभरात 330 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळवून दिले आहेत.
राकेश झुनझुनवाला यांची टाटा समुहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. सप्टेंबर तिमाहीत त्यांनी टाटा कम्युनिकेशन्समधील गुंतवणूक वाढवली होती.
झुनझुनवाला यांचा कंपनीतील हिस्सा 1.04 टक्क्यांवरुन 1.08 टक्के झाला आहे. राकेश यांनी पत्नी रेखा यांच्या नावाने या कंपनीत गुंतवणूक केलीय. त्यांच्याकडे कंपनीचे 30 लाख 75 हजार 687 शेअर्स आहेत.
नॅशनल अॅल्युमिनिअम अर्थात नॅल्कोमध्येही जुलै ते सप्टेंबर तिमाहीत झुनझुनवाला यांचे 2 कोटी 50 लाख इक्विटी शेअर्स (1.36 टक्के हिस्सेदारी) होते. राकेश झुनझुनवाला यांच्यासह एलआयसीचाही नॅल्कोमध्ये 1.1 टक्के वाटा आहे.
राकेश झुनझुनवाला यांनी तीन बॅंकांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. पैकी गेल्या महिन्यात त्यांनी कॅनेरा बॅंकेचे 2 कोटी 88 लाख 50 हजार रुपयांचे शेअर्स घेतले. यापैकी एका शेअरची किंमत 10 लाख रुपये आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियो मध्ये जवळपास 46 स्टॉक्स आहेत. त्यातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची किंमत 12.77 टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जाते. अवघ्या दोन शेअर्समधून राकेश झुनझुनवाला यांनी ऑक्टाेबरच्या पहिल्या 20 दिवसांतच 111 कोटी रुपये कमावले.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511