SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अनन्या पांडेच्या घरी ‘एनसीबी’चा छापा, शाहरुखच्या ‘मन्नत’चीही झाडाझडती, रोज नवनवे खुलासे..

मुंबईतील क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. अवघे बाॅलिवूडच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) रडारवर आले आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या वांद्रे येथील घरी आज (गुरुवारी) सकाळी  ‘एनसीबी’ (NCB) पथकाने तब्बल 4 ते 5 तास चौकशी केली. अनन्याचा फोन ‘एनसीबी’ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. मुंबई ड्रग्ज प्रकरणाबाबत चौकशीसाठी आज दुपारी तिला पुन्हा बोलाविले होते.

Advertisement

आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव समोर येत होते. ती अनन्या पांडेच असल्याचे बोलले जात असले, तरी अद्याप त्याला पुष्टी मिळालेली नाही.

क्रूझवरील ड्रग पार्टीतही अनन्या पांडे उपस्थित होती. मात्र, ‘एनसीबी’ पथकाने त्यावेळी तिला जाऊ दिले होते. मात्र, आर्यनच्या चॅटमध्ये तिचे नाव समोर आल्याने ‘एनसीबी’ने आजची कारवाई केल्याचे समजते..

Advertisement

अनन्या पांडे सोबतच ड्रग्स चॅटमध्ये आर्यनची बहीण सुहाना खान हिचेही नाव समोर येतेय. त्यामुळे अनन्या पांडेच्या घरून ‘एनसीबी’ची टीम शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यावर पोहोचली. तेथेही बराच वेळ ‘सर्च ऑपरेशन’ करण्यात आले.

जवळपास अर्धा तास ‘एनसीबी’ची टीम शाहरुख खानच्या ‘मन्नत’ निवासस्थानी उपस्थित होती. “आमचा तपास सुरू आहे. साक्षीदार आणि संशयित दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. ‘मन्नत’मधील कोणालाही चौकशीसाठी नोटीस दिलेली नाहीये. हा एक तपास प्रक्रियेचा भाग आहे..” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

आर्यनच्या भेटीसाठी शाहरुख तुरुंगात
दरम्यान, मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान आज (गुरुवारी) सकाळी 9 वाजता मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात गेला. जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली. मात्र, त्यांना केवळ 10 मिनिटांत दोघांना भेट आटोपती घ्यावी लागली.

बाप-लेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळाला नाही. शाहरुखनेही या भेटीनंतर माध्यमांशी बोलण टाळलं.

Advertisement

आर्यनचा जामीन अर्ज काल (ता. 20) ‘एनडीपीएस’च्या विशेष कोर्टाने फेटाळल्याने शाहरुखसह खान कुटुंबाला मोठा झटका बसला आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी काही दिवसांसाठी वाढला आहे. गेल्या तीन ऑक्टोबरपासून तो ‘एनसीबी’च्या कोठडीत आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement