SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमचीही एलआयसी पॉलिसी असेल, तर लवकर पूर्ण करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे ट्रान्सफर करण्यास येणार अडचणी

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने सप्टेंबरमध्ये पॉलिसी धारकांसाठी मोठी घोषणा केली होती. त्यानुसार आता एलआयसीच्या पॉलिसीशी पॅन कार्ड जोडणे आवश्यक असेल. सध्या बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी अनेक कागदपत्रे मोठ्या प्रमाणावर पॅन कार्डाशी लिंक केली जात आहेत. आता एलआयसीने देखील पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

भारतीय जीवन विमा महामंडळानं (Life Inurance Corporation of India) आपल्या करोडो पॉलिसीधारकांना एक मेसेज पाठवल्याचं समजतंय. एलआयसीनं (LIC) ग्राहकांना पाठवलेल्या एसएमएसमध्ये (SMS) म्हटलंय की, ‘पीएमएलएनुसार (PMLA) 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन लिंक आवश्यक आहे. म्हणून, पॉलिसीधारकाने ताबडतोब त्याच्या एलआयसी पॉलिसीमध्ये पॅन कार्ड लिंक करुन घ्यावे, असं नमूद केलंय.

Advertisement

पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणं गरजेचं?

तुम्हाला तुमचं पॅन कार्ड पॉलिसीशी जोडणं (PAN link with LIC policy) आवश्यक आहे. एलआयसी आता थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करते. जर तुमची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि पॉलिसी पॅन कार्डशी जोडलेली नसेल, तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येऊ शकतात. म्हणून, हा त्रास टाळण्यासाठी, तुम्हाला पॅन कार्ड पॉलिसीशी जोडावं लागेल.

Advertisement

जर तुम्ही कोणतीही LIC पॉलिसी घेतली अजून पॅनशी जोडलेली नसेल तर तुम्ही हे काम घरबसल्या ऑनलाईन करू शकता..

▪️ तुमच्या पॉलिसीशी पॅन कार्ड नंबर लिंक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला LIC च्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल 👉 https://licindia.in/Home/Online-PAN-Registration

Advertisement

▪️ तुम्हाला ऑनलाईन पॅन नोंदणीवर क्लिक करावे लागेल. एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅन तपशील भरा.

▪️ त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि त्याच नंबरवर OTP येईल. OTP भरून तुमचं पॅन लिंकिंग पूर्ण होईल.

Advertisement

▪️ फॉर्म सबमिट केल्यावर, तुम्हाला एक यशस्वी नोंदणी झाल्याचा मेसेज येईल, ज्यामध्ये नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती असते. आता तुमचे पॅन पॉलिसीशी लिंक झाले आहे, असं समजून येईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement