SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बाळाला मोबाईलमध्ये कार्टून दाखवून जेवू घालताय? मग वाचा आईने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं…

जगात असं एकही घर नसेल, की त्यांच्या कुटुंबात छोटं लहान बाळ नसेल. लहान मुले घरात असली की, घरातील वातावरण खुलते, हे आपल्याला माहीतच आहे. त्याच्यासोबत खेळत आपले दिवस कसे जातात हे कळत नाही. आता ते चिमुकले मूल मांडीवर किंवा एका जागेवर असते तोपर्यंत ठिक आहे. पण जेव्हा ते पालथे पडायला, रांगायला लागते म्हणजेच मोठे होते तशा अनेक गोष्टी बदलत जातात.

लहान मुलांना खायला घालणे हा पालकांसाठी मुख्यत: आईसाठी मोठं काम असते. त्यांना जेवणासाठी एका जागेवर कसे बसवायचे, ते नीट सगळे जेवण होईपर्यंत एका जागेवर बसतील यासाठी काय करायचे अशा एक ना अनेक गोष्टी यामध्ये येतात.

Advertisement

▪️ मुलांचे पोट भरण्यासाठी आई पेस्ट स्वरुपातील खायला घालताना आईने त्याची चव व ती पेस्ट किती गरम आहे कितपत थंड होऊन मुलाला खाऊ घातली पाहिजे हे बघावे. आतापर्यंत त्यांनी दूध सोडून कोणत्याही पदार्थाची चव न घेतल्याने आणि पहिल्यांदाच वेगळे काही खाल्ल्याने ते सुरुवातीला अन्न जीभेने बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात. मात्र पालकांना आपण केलेले अन्न मुलाला आवडलेले नाही असे वाटते. पण ते तसे नसते, नवीन पदार्थांची चवच माहित नसल्याने ते असं करतात.

▪️ कधी कधी मुलं अनेकदा वेडेवाकडे तोंड करतात, तेव्हाही तुमच्या छोट्या मुलांना ते अन्न आहे आणि ते आत गिळायचे असते हे अजून माहित नसल्याने ते असं करतात. पदार्थाची चव, तो भरवलेला घास त्यांच्यासाठी नवीनच असल्याने ते असे करतात.

Advertisement

▪️ तुमच्या घरातील छोटं बाळ आईच्या दुधावर असतं आणि जेव्हा आपण त्याला अचानक काही खाऊ घालतो तेव्हा ते खाताना तोंड, कपडे, फरशी, खुर्ची सगळे खराब करतं. आई सतत बाळाचे तोंड, कपडे, फरशीवर सांडलेले साफ करायचा प्रयत्न करते. बाळाला मात्र त्या पदार्थाशी मनसोक्त खेळायचे असते, मग त्याच वेळी बाळाला त्या पदार्थाशी कम्फर्ट तयार होईल म्हणून तसे करु द्या. सगळ्यात शेवटी तुम्ही बाळाला आणि आजुबाजूच्या गोष्टींना साफ करा.

▪️ आपल्या घरातील बाळ रात्री आणि दिवसाही जास्त चांगले झोपावे किंवा त्याचे पोट व्यवस्थित भरावे यासाठी अनेक पालक बाळाला खूप लवकर वरचे अन्न द्यायला सुरू करतात. पण डॉक्टरही सांगतात की कमीत कमी 6 महिन्यांनंतर पाणी प्यायला द्या तर अन्न देणं लांबचीच गोष्ट असते, तसं याविषयी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या म्हणजे पूर्ण माहीती मिळेल.

Advertisement

▪️ तुमचं बाळ जास्त करून झोपत असेल किंवा तुम्ही झोपी लावत असाल तर ते जागी होताना रडते, मग त्याला भूक लागली असेल. पण असं जास्त वेळेस झालं तर ती झोपण्याची पद्धत बदलत असते, हे समजून घ्या. म्हणून लगेच खाण्यास देऊ नये. त्यामुळे त्यांना घनपदार्थ दिल्यावर ते शांत आणि नीट झोपतील असे वाटत असले तरीही 6 महिन्यानंतरच अशाप्रकारे पदार्थ द्यायला सुरुवात करायला हवी असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचेही म्हणणे आहे.

▪️ आपण जेवत असताना अन्न कसे खायला हवे. आपण ते कसे खातो या सगळ्या गोष्टी बाळ पाहते आणि त्यातून ते खायला शिकते. पालक मुलांना खायला घालताना आणखी एक चूक करतात ती म्हणजे बाळाला वेगळे खायला घालणे. आधी बाळाचे पोट भरले की आपण शांतपणे जेऊ शकू असे त्यांना वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसते. यामध्ये तुमचा तर वेळ जातोच पण बाळही नीट खात नाही. त्यापेक्षा तुम्ही जेवत असतानाच तुमच्या बाळाला सोबत जेवायला घेतल्यास ते सगळ्यांबरोबर जेवणे जास्त एन्जॉय करते.

Advertisement

बाळाचं पोट भरलं की नाही हे ओळखणे अवघड असले तरी आईला ही गोष्ट काही दिवसांत लगेच कळते. तरी बाळाचे पोट भरले असेल, तर तुम्ही त्याला आग्रहाने खायला देऊ नका, ज्याने त्याची चीड वाढेल. बाळाने पोटभर खावे हे बरोबर पण मग आपण त्याला सतत खायलाच लावलं तर अंगी लागणार नाही. बाळाचे पोट भरले की ते खायला नको म्हणते म्हणजेच तेही हातवारे किंवा तोंड मुरडून नकार दर्शवते किंवा तोंडातून अन्न बाहेर काढते. अशा सगळ्या गोष्टी आपण वेळेवर लक्षात ठेवून शांतपणे आपल्या बाळाला समजावून घ्यायला हव्यात किंवा बाळाचा आहार आणि आपली बाळाशी वागणूक काशी असावी, याविषयी डॉक्टरांशी नक्की बोलून घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement