SpreadIt News | Digital Newspaper

ब्रेकिंग : आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला, कोर्टाने पुन्हा एकदा जामीन फेटाळला..

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचे जामीनअर्ज आज (ता. 20) ‘एनडीपीएस’ कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावले. त्यामुळे आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला आहे.

‘एनडीपीएस’च्या विशेष कोर्टात आर्यनसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज (ता. 20) सुनावणी झाली. त्यात कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे अभिनेता शाहरुखसह खान कुटुंबाला मोठा झटका बसला आहे. आर्यन खान तीन ऑक्टोबरपासून ‘एनसीबी’ कोठडीत आहे.

Advertisement

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यानंतर तीन दिवसांची एनसीबी कोठडी दिली. त्याची मुदत संपल्यावर सगळ्यांना तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावर आर्यनच्या जामीनावर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टात आर्यन खान तसेच एनसीबीच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली होती. कोर्टाने आरोपींच्या जामीनावरील निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत राखून ठेवला होता. त्यानुसार आज कोर्टान पुन्हा सुनावणी झाली.

Advertisement

‘एनडीपीएस’च्या विशेष कोर्टाने आर्यन खानसह सगळ्या आरोपींचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला आहे. दरम्यान, या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे आरोपी मुनमुन धमेचाचे वकील काशिफ यांनी सांगितले.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement