SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार..? ‘बीसीसीआय’ने केला मोठा खुलासा.. नेमकं काय म्हटलंय वाचा..

टी-20 वर्ल्डकप 2021 ला 17 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. मात्र, साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष एकाच लढतीकडे लागलेले आहे, ते म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान.. या दोन्ही संघांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. मात्र, हा सामना होणार की नाही, याबाबत सवाल उपस्थित होत आहेत.

मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. अतिरेक्यांकडून निष्पाप भारतीय नागरिकांवर जीवघेणे हल्ले होत असल्याने, दोन्ही देशांदरम्यान कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकसोबतचा सामना खेळू नये, अशा मागणी होतेय.

Advertisement

यंदाच्या टी-20 विश्वचषकाचा भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. वन-डे असो वा टी-20 विश्वचषक.. भारताचा पाकिस्तानविरुद्धचा रेकाॅर्ड खूपच चांगला राहिलेला आहे. भारत अद्याप कधीही पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. यंदाही पाकिस्तानपेक्षा टीम इंडिया सरस असल्याचेच दिसते.

दुसरीकडे, पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या कुरापती सुरु असल्याने अनेक राजकीय नेत्यांसह विविध संघटनांनीही भारत-पाकिस्तान (India vs pak) सामना रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ‘बीसीसीआय’वर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. अखेर ‘बीसीसीआय’ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement

‘बीसीसीआय’ काय म्हणतेय..?
दरम्यान, याबाबत ‘बीसीसीआय’चे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, की “”आम्ही जम्मू -काश्मीरमधील हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ‘आयसीसी’सोबत (ICC) केलेल्या कमिंटमेंटमुळे भारत-पाक सामना रद्द केला जाऊ शकत नाही..!”

राजीव शुक्ला पुढे म्हणाले, की तुम्हाला ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये सगळ्या संघांविरुद्ध खेळावंच लागेल. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा ‘हाय व्होल्टेज’ सामना आम्ही रद्द करु शकत नाहीत.

Advertisement

दरम्यान, भारत-पाकिस्तानमध्ये 24 ऑक्टोबरला दुबईतील मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. विराट कोहलीची फौज या सामन्यानेच आपल्या टी-20 विश्वचषकाच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement