SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएफ ऑनलाईन कसा ट्रान्सफर करायचा? नोकरी बदलल्यावर पीएफ खात्याचं काय करायचं, वाचा..

ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या अनेक सेवा सोप्या करण्यासाठी डिजिटल पावले उचलली आहेत. जर तुम्ही नेहमीच नोकऱ्या बदलत असाल तर कंपनी किंवा नोकरी बदलल्यानंतर तुमच्या भविष्य निर्वाह निधीचे (PF) पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करणे महत्त्वाचे आहे.

ईपीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करून अनेक सेवा सहजपणे घेता येतात. आता कर्मचारी स्वतः नोकरी सोडण्याची तारीख अपडेट करू शकतात. तसेच नोकऱ्या बदलल्यानंतर कित्येक वेळा आपली आधीची कंपनी किंवा नोकरी सोडली तर लोक त्यांचे पीएफ खाते ट्रान्सफर करणे विसरू शकतात. जर एखाद्या व्यक्तीने त्याची किंवा तिची नोकरी बदलली तर आपले पीएफ खाते ऑनलाइन पद्धतीने ईपीएफओच्या पोर्टलवर लॉग इन करून सहजपणे ट्रान्सफर करता येणार आहे. ईपीएफओने यासंदर्भात अलीकडेच ट्विट करत ही माहिती दिली आहे

Advertisement

नोकरी सोडण्याची तारीख EPFO च्या वेबसाईटवर अपडेट करताना..

▪️ तुम्हाला अगोदर unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
▪️ आता लॉग इन करताना यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चा कोड भरा.
▪️ आता एक नवीन पेज उघडल्यानंतर, सर्वात वर ‘मॅनेज’ वर क्लिक करा.
▪️ आता मार्क एक्झिटवर क्लिक करा.
▪️ मग ड्रॉपडाऊनमध्ये सिलेक्ट एम्प्लॉयमेंट असं दिसेल, तिथे तुमचा UAN शी लिंक असलेला जुना PF खाते क्रमांक निवडा. त्या खात्याशी आणि नोकरीशी संबंधित सर्व माहीती तिथे दिसेल.
▪️ आता तुम्हाला तुमची नोकरी सोडण्याची तारीख आणि कोणत्या कारणास्तव नोकरी सोडली ते भरा.
▪️मग ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. ओटीपी भरा करा आणि चेक बॉक्सवर क्लिक करा.
▪️ अपडेटवर क्लिक करा, नंतर ओके म्हटलं की तुमचं काम झालं.

Advertisement

ऑनलाईन पद्धतीने ईपीएफ खाते कसे ट्रान्सफर करायचे?

▪️कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर गेल्यावर युएएन (UAN) आणि पासवर्डद्वारे लॉग इन करा.
▪️तिथे तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस पर्यायावर जा आणि वन मेंबर वन अकाउंटवर (One Member, One Account) क्लिक करावे लागेल.
▪️ आपल्या सध्याच्या कंपनीसाठी तुमची वैयक्तीक माहीती आणि पीएफ खाते Verify वर क्लिक करून (तपासणी) घ्या.
▪️ गेट डिटेल्सवर क्लिक करा. आता आधीच्या कंपनीच्या पीएफ खात्याची माहिती येईल.
▪️ फॉर्म पूर्ण करण्यासाठी आधीची किंवा सध्याची कंपनी निवडा.
▪️ गेट ओटीपीवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी येईल.
▪️ ओटीपी भरून सबमिट बटणावर क्लिक करा.
▪️ जी कंपनी तुम्ही निवडली आहे तिच्याकडून अटेस्टेशन झाल्यानंतर ईपीएफओ तुमचे ईपीएफ खाते ऑनलाइन ट्रान्सफर करेल आणि तुमच्या नवीन कंपनीला तुमच्या पीएफ खात्यात पैसे जमा करता येतील.

Advertisement

पीएफ खाते अपडेट ठेवणं गरजेचं?!

तुमचे पीएफ खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही युएएन (UAN) आधारशी लिंक केले नाही तर तुमची कंपनी तुमच्या पीएफ खात्यात दरमहा पीएफचे योगदान जमा करू शकणार नाही आणि जर तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढायचे असल्यास आधारशी युएएन लिंक असणेदेखील आवश्यक आहे. ऑनलाईन क्लेम करताना ई-नामांकन फाईल करताना याचा उपयोग होतो. कर्मचारी वर्गाचे आधार कार्ड पीएफ खात्याशी किंवा युएएनशी लिंक करण्याची जबाबदारी तो नोकरी करत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनाची असते. आधार कार्ड लिंक नसल्यास कर्मचाऱ्याला पीएफ खात्यात तीच रक्कम दिसेल जी त्याच्या वेतन आणि महागाई भत्त्याद्वारे येते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement