SpreadIt News | Digital Newspaper

कोथिंबीरला सोन्याचा भाव! राज्यात भाजीपाला झाला महाग, किती दरवाढ झाली वाचा..

राज्यात सध्या लांबलेल्या पावसाने स्थानिक पिकांना चांगले झोडपून काढले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनात तर भरमसाठ वाढ झालेलीच आहे पण भाजीपाल्याचे भाव देखील आता वाढले आहेत. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कोथिंबीर जागेवरच खराब झाली आहे.

कोथींबीरसह भाजीपाल्याच्या दरातही मोठी वाढ

Advertisement

राज्यातील सर्वांत महाग कोथिंबीर नागपुरात विकली जात आहे. कोथिंबीरीची आवक कमी झाल्याने ही दरवाढ झालेली आहे. नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये कोथिंबीरचा 250 ते 300 रुपये किलोचा दर सुरु आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात आणि हातठेल्यांवर कोथिंबीर 320 ते 360 रुपये किलोने विकली जात आहे.

नाशिक, नगर , पुणे भागात पडलेल्या पावसाने पालेभाज्या तर मातीमोल झाल्या आहेत. सद्या फक्त 450 ते 500 गाड्यांची आवक होत असून जवळपास 300 गाड्या आवक कमी झाली आहे. सध्या मध्यप्रदेश, छिंदवाडा, नांदेड येथून कोथिंबीरची आवक नागपुरात होत आहे. मालवाहतुकीचे दर वाढल्याने देखील कोथिंबीरच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

Advertisement

शेतात साठलेल्या पावसात भाजीपाला सडल्याने एपीएमसी मध्ये आवक घटली आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचा 10 ते 15 रूपये जुडी असणारा भाव थेट 50-60 रूपयांच्या आसपास गेला आहे. त्यामुळे कोथिंबिरीपेक्षा एकवेळ अंडी, चिकन, मासे असे मांसाहारी पदार्थ खाणे सामान्य माणसाला परवडणार की काय असंच वाटत आहे.

मुंबईत कांदे आधी 30-35 रुपये प्रति किलो होते तेच आता 55-60 रुपये किलो विकले जात आहेत.यासोबतच सर्व भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटो आधी 20 प्रति किलो होते ते आता थेट 80 रुपये किलो झाले आहेत. प्रत्येक भाजीमागे 30 ते 40 रुपये किलो भाववाढ होत आहे. वाशी येथील एपीएमसीच्या भाजीपाला बाजारात आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत.

Advertisement

कालपासूनचे भाजीपाला दर: प्रति/किग्रॅ (अंदाजे)

▪️ टोमॅटो – 70-80
▪️ फरसबी – 80-90
▪️ वटाणा – 160-170
▪️ गवार – 120-130
▪️ भेंडी – 75-80
▪️ शिमला – 100-110
▪️ दोडका – 90-100
▪️ फ्लाॅवर – 90-100
▪️ कोबी – 60-70
▪️ शेवगा – 150-160

Advertisement

▪️ कोथिंबीर – 60-65 प्रति जुडी
▪️ मेथी – 40-50 प्रति जुडी
▪️ पालक – 30-40 प्रति जुडी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement