SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीत मोठी चूक, जाहिरातीतील ‘तो’ हात नेमकं कुणाचा?

सोशल मीडिया म्हटलं की मजेदार किस्से आलेच. अशा वेळी कधी कधी तर सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण बिनधास्तपणे मत मांडताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रीय असणारे यूजर्स ट्रेंड कोणता सुरू करतील याचा काही नेम नाही. ताज्या घडामोडींपासून ते कलाकारांच्या पोस्टपर्यंत त्यांची अनेक ठिकाणी नजर असते.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत असंच काही घडले आहे. एका ट्विटरवरील यूजरने बिग बींच्या जाहिरातीमधील चक्क चूक शोधून काढली आहे आणि त्यावरून चांगलीच चर्चा पसरली आहे.

Advertisement

जाहिरातीसाठी शूट आणि एकच चर्चा..

अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एक जाहिरातीचे चित्रीकरण पूर्ण केले. या जाहिरातीमधील एका फोटोमध्ये ते एका फिमेल मॉडेलच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहेत.

Advertisement

आता तुम्ही म्हणाल की, मग त्यात एवढं काय! पण तो हात बिग बींचा नसून त्या फोटोमध्ये फोटोशॉप केल्याचं दिसून आलं आहे. ट्विटरवरील एका यूजरने ही चूक दाखवून दिली आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर कमेंट करण्यात मग्न झाले आहेत.

एका यूजरने या जाहिरातीचा फोटो ट्विटरवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करत ‘अशी चाणाक्ष नजर प्रत्येकाकडे नसते’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘कुणी बारकाईने पाहिले आहे का? या फोटोमधील वडिलांचा हात किती लांब आहे’, असं म्हटलं आहे.

Advertisement

हा फोटो यासाठी की ही एक अभिनेत्री नाही आणि बिग बींना तिच्यासोबत पोझ देण्याची इच्छा नाही. पण फोटोशॉपसाठी ’10 पैकी 1 गूण’ या आशयाचे ट्वीट केले आहे. तिसऱ्या एका यूजरने तो हात कुणाचा आहे असा प्रश्नदेखील विचारला आहे. खरं तर ज्याला कोणाला हे लक्षात आलं आहे, त्यांनी तर ही गोष्ट पूर्ण व्हायरल केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement