SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवऱ्याने बायकोवर काढला राग, नवरा बायकोच्या भांडणात 10 घरांना लागली आग!

😳 आजकाल सोशल मीडियाच्या युगात भलतेच किस्से, प्रसंग व्हायरल होत असतात. अशीच एक आगळी-वेगळी घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव येथे घडली आहे. याठिकाणी नवरा-बायकोचं भांडण चाललं असताना त्याची झळ त्यांना स्वतःला तर बसली पण शेजाऱ्यांनाही चांगलीच बसली आहे.

🤔 नेमकं प्रकरण काय? वाचा…

Advertisement

▪️ माजगावमधील एका घरात पती पत्नीच्या भांडणात लाखोंचं नुकसान झालं आहे. त्यांच्या भांडणाची झळ गावातील 10 घरांना बसली आहे आणि त्यामुळे 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं समजत आहे.

🏠 पती-पत्नीचं भांडण चाललं असताना स्वतःचे घर जाळताना आजूबाजूच्या 10 घरे जळून खाक झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील माजगावला घडली आहे. असंही म्हटलं जात आहे की, संतप्त गावकऱ्यांनी नवऱ्याला चोप दिला आहे.

Advertisement

▪️ भांडणाचं नेमकं कारण माहीत नसलं, तरी पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील त्या पती-पत्नीचं नाव संजय पाटील आणि पल्लवी आहे. यांची काही घरगुती कारणावरून भांडण सुरू झाले असता सर्व घटना घडली.

⚡ भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेंव्हा घरातील सिलेंडर ने ही पेट घेतला. नंतर या आगीने रौद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे 10 घरांना त्याचा फटका बसला आहे. आजूबाजूची सुमारे दहा घरे जळून खाक झाली.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏆 महत्वाची बातमी: टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने इंग्लंडला चारली पराभवाची धूळ!

🏏 भारताच्या ‘त्या’ दोन फलंदाजांची सराव सामन्यात तुफानी खेळी

Advertisement

💁🏻‍♂️ सविस्तर बातमी वाचा एकाच क्लिकवर 👉 bit.ly/3aNrDXU
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर जाळणाऱ्या पतीला ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगलाच चोप दिला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement