SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात गडकरींचे नाव, राजकारणविरहित अनोखी मैत्री जपली..!

राजकारणात सध्या एकमेकांबद्दलचा आदर, सन्मान, मोठेपणा हे शब्द कुठेतरी हरवल्याचे दिसत आहे. राजकारणाचा स्तर इतका घसरलाय, की अगदी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिकरित्या एकमेकांवर चिखलफेक केली जाते. आरोप-प्रत्यारोप होतात.

कमालीच्या द्वेषाने भरलेल्या या राजकारणाच्या चिखलातही मैत्रीची काही कमळे फुलली आहेत. कधी काळी राजकारणात मतमतांतरे असली, तरी एकमेकांबद्दल आदर-सन्मान ठेवला जायचा.. पक्षविरहीत, राजकारणविरहीत मैत्रीची अनेक किस्से सांगितले जातात..

Advertisement

असाच एक ‘दो हंसो का जोडा..’ म्हणजे माजी खासदार दत्ता मेघे नि सध्याचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी.. सध्या भाजपात असलेले दत्ता मेघे एकेकाळी काँग्रेस नेते, माजी खासदार.. पण विरोधी पक्षात असतानाही त्यांचा गडकरी यांच्याविषयीचा आदर कमी झाला नाही.

एकमेकांबद्दल इतका प्रचंड विश्वास, की दत्ता मेघे (Datta Meghe) यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात चक्क नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव लिहिलंय. विश्वास बसत नाही ना.. पण खुद्द दत्ता मेघे यांनीच याबाबत एका जाहीर कार्यक्रमात ही माहिती दिली.

Advertisement

वर्धा पालिकेच्या विकासकामाचे ई-भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात बोलताना, मेघे यांनी हा खुलासा केला. विशेष म्हणजे, त्यावेळी गडकरी हे मेघे यांच्या बाजूलाच बसले होते.

मृत्यूपत्रात गडकरींचे नाव..
मेघे म्हणाले, की “राजकारणात माझे सर्वच पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध राहिले. नितीनजी तर आमच्या फॅमिलीतील महत्वाचे नेते.. माझ्या मृत्यूपत्रात काही घोळ होऊ नये, म्हणून मी त्यांचे नाव लिहिलं आहे…” गडकरी हे देशातील प्रत्येक राज्यामध्ये जाऊन काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

एखाद्या राजकारण्याने आपली अख्खी हयात एका पक्षात घालवली. मात्र, स्वत:च्या मृत्यूपत्रात कुटुंबातील सदस्याचे वा पूर्वाश्रमीच्या पक्षातील कोणत्याही नेत्याचं लिहिलं नाही, तर काही दिवसांपूर्वीच नव्या पक्षात प्रवेश केलेला असताना, त्या पक्षातील जून्या नेत्याचे नाव घालणे, फारच आश्चर्याची गोष्टंय…

दरम्यान, दत्ता मेघे यांच्या मृत्यूपत्रात गडकरी यांचे नाव नेमकं का, कशासाठी टाकण्यात आलं, हे मात्र समजू शकलं नाही. वारस म्हणून की संपत्तीचे ट्रस्टी म्हणून गडकरी यांना मेघे यांनी नेमलंय, याबाबत कळू शकले नाही..

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement