रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका, म्हणजे रास्त दर दुकानातून जीवनाश्यक वस्तू व शिधा मिळविण्यासाठी सार्वजनिक वितरण योजनेमार्फत पुरविण्यात येणारी व्यवस्था…!
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात धान्य पुरविले जाते. कुटुंबातील सदस्य संख्येच्या आधारावर, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत, सरकार रेशनकार्डधारकांनी स्वस्त दरात रेशन पुरविते.
गरजूंच्या दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने सरकारने रेशनकार्डवर (ration card) स्वस्त दरात दर महिन्याला ठराविक धान्य उपलब्ध करून देते. प्रत्यक्षात अनेक कार्डधारक मात्र या सवलतीचा लाभच घेत नसल्याचे समोर आले आहे.
शहरी भागात तर लाभ न घेणाऱ्या अशा कार्डधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसते. मात्र, दीर्घ काळ धान्य घेण्यासाठी रेशनकार्ड वापरले नाही, तर तुमचे कार्ड रद्दही होऊ शकते.
रेशनकार्डधारकाने कोणत्या महिन्यात किती रेशन घेतलेय, कुटुंबांत किती सदस्य आहेत, याची सर्व माहिती रेशनकार्डमध्ये असते. मात्र, त्यात विसंगती आढळल्यास रेशनकार्ड रद्द केले जाते. याबाबत नेमका काय नियम आहे, याबाबत जाणून घेऊ या..
नेमका नियम काय..?
सलग सहा महिने रेशनकार्ड धारकाने रेशन घेतले नाही, तर असे मानले जाते की त्याला स्वस्त दरात उपलब्ध अन्नधान्याची गरज नाही किंवा तो रेशन घेण्यास पात्र नाही. अशा वेळी संबंधित व्यक्तीचे रेशनकार्ड रद्द केले जाऊ शकते. राजधानी दिल्ली, बिहार, झारखंडमध्येही रेशनकार्डबाबत हेच नियम लागू आहेत.
काही कारणास्तव तुमचे रेशनकार्ड रद्द झालेच, तर तुम्हाला ते पुन्हा सुरुही करता येते. त्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे, याबाबत जाणून घेऊ या..
रद्द झालेले रेशनकार्ड असे करा सुरु?
– सर्वप्रथम राज्य किंवा केंद्रीय AePDS पोर्टलवर जा.
– त्यावरील ‘रेशनकार्ड करेक्शन’ पर्यायावर क्लिक करा.
– रेशनकार्ड सुधारणा पृष्ठावर जावून आपला रेशन नंबर शोधण्यासाठी फॉर्म भरा.
– तुमच्या शिधापत्रिकेच्या माहितीत काही चूक झाली असेल, तर ती चूक दुरुस्त करा.
– नंतर स्थानिक PDS कार्यालयाला भेट देऊन पुनरावलोकन अर्ज सबमिट करा.
– रेशनकार्ड सक्रिय करण्याचा अर्ज स्वीकारल्यास रद्द केलेले रेशनकार्ड पुन्हा सक्रिय केले जाते.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511