SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता चित्रपटगृहात ‘या’ मराठी चित्रपटांचा डंका वाजणार; परश्यापासून-दगड्यापर्यंत सर्वच कलाकार दिसणार

मराठी चित्रपटगृहांना प्रदर्शनाचा हिरवा कंदील मिळाल्यानंतर जयंती, झिम्मा, गोदावरी, डार्लिंग, फ्री हिट दणका, दे धक्का 2 हे आगामी मराठी सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत. हे सर्वच चित्रपट अतिशय मनोरंजक असणार आहेत. बॉलिवूड नाहीच तर आता मराठी चित्रपटसृष्टीही आता रसिकांना वेड लावण्यात मागे नाही.

आगामी रिलीज होणारे मराठी चित्रपट कोणते?

Advertisement

▪️ जयंती (Jayanti) : ‘जयंती’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जयंती सिनेमा 26 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. लेखक शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित ‘जयंती’ हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला सुरेख कथा असलेला बहुचर्चित आगामी चित्रपट आहे.

▪️ झिम्मा (Jhimma): पुढील महिन्यात येत्या 19 नोव्हेंबरला ‘झिम्मा’ सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येणार आहे. चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर सर्व अभिनेत्रींसोबत मुख्य भूमिकेत आहे. ‘झिम्मा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे आहेत. निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्री या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.

Advertisement

▪️ गोदावरी (Godawari): ‘गोदावरी’ सिनेमा येत्या 3 डिसेंबर 2021 ला रिलीज होणार आहे. जितेंद्र जोशी, नीणा कुलकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोकले या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत. गोदावरी सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता जितेंद्र जोशी निर्मिती क्षेत्रात उतरला आहे.

▪️ डार्लिंग (Darling): तरुणीवर पुन्हा एकदा छाप सोडण्यासाठी ‘डार्लिंग’ सिनेमा काही दिवसांतच 10 डिसेंबर 2021 ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक समीर पाटील आहे. या चित्रपटात प्रथमेश परब आणि रितीका श्रोत्रीची जोडी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. प्रथमेश आणि रितीकाने त्यांच्या धम्माल जोडीने याआधी ‘टकाटक’ चित्रपटही हिट केला आहे.

Advertisement

▪️ फ्री-हिट दणका (Free Hit Danaka): पोस्टरवरून समजुन येतं की, फ्री हिट दणका चित्रपटात काय असेल. हा चित्रपट येत्या 17 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील मगरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यात फँड्री फेम सोमनाथ अवघडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर सैराट चित्रपटातील अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

▪️ दे धक्का 2 (De Dhakka 2): मराठीतील विनोदाचा धमाका असलेला ‘दे धक्का’ चित्रपट सर्वांचाच आवडता आहे. तर आता ‘दे धक्का 2’ चित्रपट 1 जानेवारी 2022 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. “दे धक्का 2” च्या पोस्टरमध्ये मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, महेश मांजरेकर दिसून येत आहेत. ते कारमधून उतरत आहेत. तर परदेशी पाहूणी त्यांचे सामान उतरवताना दिसून येत आहे.

Advertisement

परश्याची पुन्हा होणार धमाकेदार एंट्री

फँड्री’, ‘सैराट’ व ‘नाळ’च्या उत्तुंग यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओज मिळून ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमाची निर्मिती करणार आहेत. या सिनेमाचे संवाद आणि पटकथा नागराज मंजुळे आणि हेमंत अवताडे यांनी लिहिले आहेत. अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट फेम आकाश ठोसर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे, सयाजी शिंदे या ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाला संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले आहे. नागराज मंजुळे आणि भूषण मंजुळे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर हा सिनेमा 2022 साली प्रदर्शित करण्यात येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement