SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महत्वाची बातमी: कांद्याचे भाव वाढणार? दिवाळीपर्यंत किती असणार भाव, वाचा..

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या जुन्या कांद्याची मागणी इतर राज्यांमध्ये झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या मागणीमुळे बाजारात कांद्याचे भावही झपाट्याने वाढत आहेत. सध्या नवीन कांदा बाजारात उपलब्ध नाही. महाराष्ट्राच्या जुन्या कांद्याला देशभरात सर्वाधिक मागणी आहे

कांद्याच्या भावात कशामुळे वाढ?

Advertisement

राज्यातील सततच्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात सध्या सुमार दर्जाचा कांदा येत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, शिरूर, जुन्नर आणि नाशिक, संगमनेर, अहमदनगर येथील शेतकरी कांद्याचा मोठा साठा ठेवतात. म्हणून कांद्याची आवक कमी झालेली असताना मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत.

नव्याने येत असलेला कांदा पावसामुळे ओला झाला आहे तर सडत देखील चालला आहे. त्याचा दर्जा घसरल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या मते नवीन कांदा तयार होण्यास थोडा वेळ लागेल. शेतकऱ्यांनी कांदे पुन्हा लावले असून हा कांदा नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत मार्केटमध्ये येईल. त्यामुळे त्यापूर्वी कांद्याचे भाव आणखी वाढू शकतात.

Advertisement

ऐन सणासुदीत व्यापाऱ्यांसह ग्राहकांना दर्जेदार कांद्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. गेल्या आठवड्यात 30 रुपये प्रति किलो असलेला कांदा 50 रुपये किलोवर गेला आहे. सुमार दर्जाचा कांदाही 40 रुपये प्रति किलो झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर कांदा 60 ते 70 रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात कांदा मुबलक आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा होत नाही. ठोक व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली असून जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला आहे. यामुळे साठवलेल्या जुन्या कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील नवे कांद्याचे पीक खराब झाल्याने दरामध्ये तेजी दिसत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि मेसेजमध्ये आलेला क्रमांक ग्रूपमध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement