SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नकळत चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झालेत.., अशा प्रकारे मिळवा सगळी रक्कम परत..

सध्या डिजिटल (Digital) व्यवहाराचे प्रमाण वाढले असले, तरी अद्याप अनेकांना ऑनलाइन व्यवहार करताना अडचणी येत आहेत. त्यातून अनेकदा काही चुका होतात नि त्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो.

मोबाईल बॅंकिंग (Mobile Banking) करताना काही वेळा चुकून भलत्याच बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातात. काही वेळा ऑनलाईन फसवणूकही केली जाते. आपण ही रक्कम परत मिळवू शकतो. चला तर मग, याबाबतची प्रक्रिया समजून घेऊ या..

Advertisement

बॅंकेला त्वरित कळवा
चुकून भलत्याच बॅंक खात्यावर पैसे पाठविल्यास बॅंकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून, याबाबतची माहिती द्या. बॅंकेने ई-मेल (E-mail) करायला सांगितल्यास, व्यवहाराची तारीख, वेळ, तुमचा खाते क्रमांक, ज्या खात्यावर पैसे पाठविले, त्याची माहिती नमूद करा.

खाते क्रमांक चुकीचा टाकल्यास..
चुकीचा खाते क्रमांक वा आयएफएससी (IFSC) कोड टाकला गेल्यास, पैसे आपोआप परत तुमच्या खात्यावर जमा होतील. मात्र, लवकर पैसे परत न मिळाल्यास बॅंकेत जाऊन व्यवस्थापकांना सगळी माहिती द्या.

Advertisement

कोणत्या बॅंक खात्यात पैसे गेले आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. चुकीचा व्यवहार तुमच्या स्वत:च्याच खात्यावर झाला असेल, तर ते पैसे सहज तुमच्या खात्यावर मिळतील..

भलत्याच खात्यावर पैसे गेल्यास
चुकून भलत्याच खात्यावर पैसे जमा झाल्यास ते परत मिळविण्यास जास्त वेळ लागू शकतो. बॅंकांना कधी कधी अशी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 2 महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. तुमच्याकडून कोणत्या बॅंकेत, कोणत्या शाखेत, कोणाच्या खात्यावर ही रक्कम गेलीय, याची माहिती तुम्हाला मिळू शकते.

Advertisement

ही सर्व माहिती मिळाल्यावर संबंधित शाखेशी संपर्क साधून, ही रक्कम परत मिळविण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यक्तीच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली असेल, त्याला कळवून बॅंक ही रक्कम परत करण्याची परवानगी मागेल. त्या व्यक्तीने परवानगी दिल्यावर बॅंक तुम्हाला तुमची रक्कम परत करील..

कायदेशीर मार्ग
काही वेळा समोरची व्यक्ती पैसे देण्यास तयार नसेल, तर त्यासाठी कायदेशीर मार्गही आहे. अशी व्यक्तीविरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार करु शकता. त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल करता येईल.

Advertisement

काय काळजी घ्याल..?
शक्यतो कोणताही व्यवहार करण्यापूर्वी दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे नंतर डोक्याला हात लावण्याची वेळ येत नाही. त्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा..

  • सर्वात आधी डिजिटल ट्रान्झॅक्शन करताना तुम्ही लाभार्थ्याचा प्रविष्ट केलेला तपशील योग्य आहे की नाही, हे तपासा.
  • डिजिटल व्यवहार करताना लाभार्थींचे नाव, बँक तपशील तपासून घ्या.
  • घाईघाईत व्यवहार करणं टाळा.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement