SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्यन खानचे जेलमध्ये ‘एनसीबी’ला अनोखे वचन.. म्हणाला, ‘एक दिवस तुम्हालाही…’

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan ) मुलगा आर्यन खानला (Aaryan Khan) सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवलेले आहे. आर्यनच्या जामिन अर्जावर येत्या 20 ऑक्टोबरला निर्णय होणार आहे. तोपर्यंत त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे.

कॉर्डेलिया क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीवर 2 ऑक्टाेबर रोजी ‘एनसीबी'(NCB)च्या पथकाने आर्यनसह 8 जणांना अटक केली होती. त्यानंतर तो दोन-तीन दिवस ‘एनसीबी’ कोठडीतच होता. त्यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली.

Advertisement

पार्टीत आर्यनने ड्रग्जचे सेवन केले होते का? तो पार्टीत कसा पोहोचला? यांसह विविध प्रश्नांची त्याच्यावर सरबत्ती करण्यात आली.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात सापडल्यानंतर प्रत्येकाचे कौन्सिलिंग(समुपदेशन) करण्यात येते. तसे ते आर्यनचेही करण्यात आले. त्यावेळी त्याने ‘एनसीबी’ अधिकारी समीर वानखेडे यांना एक आश्वासन दिल्याची बातमी समोर येत आहे.

Advertisement

आर्यनचे ‘एनसीबी’ला वचन..
आर्यन म्हणाला, की “मी तुरुंगातून सुटल्यानंतर एक चांगला व्यक्ती होणार आहे. जे कोणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, गरीब लोकांना मदत करेन.. यापुढे चांगले काम करीन नि एक दिवस तुम्हालाही माझा अभिमान वाटेल…!”

दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयात १४ ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. मात्र, त्यावेळी कोर्टाने आपला आदेश राखून ठेवला आहे. आता त्यावर येत्या बुधवारी (२० ऑक्टोबर) पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यावेळीच आर्यनच्या जामीनावर निर्णय होणार आहे.

Advertisement

सुनावणीस अजून ३ दिवस बाकी असल्याने आर्यनला आर्थर रोड जेलमध्ये दिवस काढावे लागणार आहेत. मुंबई सत्र न्यायालयाला १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सुट्टी आहे. त्यामुळे आर्यन खानला जामिनासाठी २० ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement