SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईलमधील काॅन्टॅक्ट नंबर उडाल्याने हैराण, मग या सोप्या ट्रिक्स वापरुन परत मिळवा नंबर..

आजच्या काळात मोबाईल शिवाय जगणे केवळ अशक्य झाले आहे. अगदी काही क्षण जरी मोबाईलपासून दूर राहिले, तरी अनेक जण बेचैन होतात. मोबाईल बिघडला वा हरवला तर आपण लगेच सैरभैर होतो. गोंधळात पडतो. नेमकं काय करु नि काय नको, असे होऊन जाते.

मोबाईल आपल्यासाठी जीव की प्राण असतोच. मात्र, त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कॉन्टॅक्ट नंबर.. एक वेळ मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ डिलीट झाले तरी, आपण तितके घाबरत नाहीत, जितके काॅन्टॅक्ट नंबर गायब झाल्यावर होतो.

Advertisement

पूर्वी आपल्या पैकी अनेकांना अगदी अनेकांचे काॅन्टॅक्ट नंबर तोंडपाठ होते. मात्र, आता तसे राहिलेले नाही. अगदी घरातील माणसांचे नंबरही अनेकांच्या पाठ नसतात. मोबाईलमध्ये नाव टाकले, की नंबर समोर येतो. त्यामुळे त्याची फारशी गरजही पडत नाही.

अशा वेळी मोबाईल चोरीला गेला, किंवा जिवाभावाच्या माणसांच्या संपर्कात ठेवणारे हेच कॉन्टॅक्ट नंबर चुकून आपल्याकडून अचानक उडाले वा गायब झाले, तर काय करायचे, असा प्रश्न पडतो. या नुसत्या विचारानेही आपण अस्वस्थ होतो..

Advertisement

मोबाईलमधील काॅन्टॅक्ट अचानक गायब झाले, तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. आपण हे सगळे काॅन्टॅक्ट परतही मिळवू शकतो. त्यासाठी काय करायचे, हे जाणून घेऊ या..

काॅन्टॅक्ट नंबर परत कसे मिळविणार..?
– सर्वप्रथम आपल्याला जीमेल अकाऊंट आयडी (Gmail account I’d) आणि जीमेल पासवर्ड (Gmail password) माहिती असायला हवा.

Advertisement

– काॅन्टॅक्ट नंबर (Contact number) परत मिळविण्यासाठी मोबाईलमध्ये जीमेल (Gmail) नसल्यास ते डाऊनलोड करा.
– जी-मेल ओपन झाल्यावर जुने अकाउंट लाॅग इन (log in) करा.

– आपल्याला गुगल अॅप्स (Google Apps)च्या डाव्या बाजूला काॅन्टॅक्ट (Contacts) आणि सेलेंडर (Celendar) चा पर्याय दिसेल. त्यातील ‘Contacts’ पर्यायावर क्लिक करा.
– नंतर आपल्यासमोर आपले सगळे काॅन्टॅक्ट नंबर आलेले दिसतील.

Advertisement

‘काॅन्टॅक्ट नंबर’ जी-मेलला लिंक कसे करणार..?
– सर्वप्रथम मोबाईलमध्ये सेटिंग्ज (Setting) मध्ये जा.
– त्यानंतर काॅन्टॅक्ट बॅकअप (Contact Backup) पर्यायावर जाऊन अकाऊंट अॅण्ड सिंक (Account and Sync)वर क्लिक करा.

– नंतर Gmail account वर जाऊन Activate करा.
– लगेच मोबाईलमधील Contact नंबर Gmail account मध्येही प्रविष्ट केले जातील.

Advertisement

टीप : या सर्व ट्रिक वापरण्याकरीता मोबाईलमधील काॅन्टॅक्ट नंबर (Contact Number) हे जी-मेल अकाउंटमध्येही (Gmail account) सेव्ह करणे आवश्यक आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement