SpreadIt News | Digital Newspaper

भारतात केरळची लोक दीर्घायुषी..! मग महाराष्ट्रातील लोक सरासरी किती वर्षे जगतात, वाचा..!

निसर्गाच्या सानिध्यात राहणारी व्यक्ती अधिक वर्षे जगू शकते, असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. मात्र, असच काही नाही. मोठ्या शहरातही निरोगी आयुष्य असणाऱ्या अनेकांनी वयाची शंभरी पार केल्याची उदाहरणे आहेत.

वास्तविक, दीर्घायुष्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. रोजचा आहार भाज्यांनी परिपूर्ण, बेताचा मांसाहार नि कमी गोड मोजका आहार, सक्रिय जीवनशैली, दातांची काळजी, शांत झोप, स्वच्छ हवा आदींचा त्यात समावेश होतो.

Advertisement

देशातील प्रत्येक राज्यातील लोकांचेही सरासरी आयुष्यमान हे वेगवेगळं असल्याचे समोर आले आहे. काही राज्यांत लोकांचे सरासरी आयुष्य 75 वर्षांपर्यंत, तर काही राज्यात 70 वर्षापर्यंत आयुमर्यादा असल्याचा एक रिपोर्ट नुकताच समोर आला आहे.

केरळचे लोक दीर्घायुषी
या रिपोर्टमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य असेल, तर ते केरळ. केरळमधील (kerala) लोकांचं सरासरी आयुष्य 75.2 वर्षे असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हवा प्रदुषणामुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेली देशाची राजधानी दिल्ली (Delhi) विशेष म्हणजे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

दिल्लीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याचे बोलले जात असले, तरी येथील लोक सरासरी 74.7 वर्षे जगत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.

जम्मू-काश्मीर हे राज्य या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणारे लोक सर्वसाधारणपणे दिल्लीइतकेच 74.1 वर्षे जगतात. चौथ्या क्रमांकावर आहे, हिमाचल प्रदेश. या भागातील लोकांचे सरासरी आयुर्मान 72.6 वर्षे असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Advertisement

महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर..?
आता तुम्हाला महाराष्ट्राबाबत उत्सुकता लागली असेल, तर या लिस्टमध्ये आपला महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील लोकांचं सरासरी आयुष्य 72.5 वर्षे असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement