आपल्या रोजच्या काही चुकीच्या सवयींचा किडनीवर खूप वाईट परिणाम होतो. तुम्हाला माहीत आहे का, जर वेळीच काळजी घेतली गेली नाही तर मूत्रपिंड निकामी किंवा खराब होऊ शकतं. हो! कारण किडनी शरीरातून विषारी घटक आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकत असते. किडनी शरीराबाहेर आम्ल काढून पाणी, मीठ आणि खनिजे प्रमाणात ठेवते. नसा, स्नायू आणि ऊतींचे योग्य संतुलन नसल्यास मानवी शरीर अचुक काम करू शकत नाही, म्हणून तुम्ही काय करायला हवं? जाणून घ्या..
वेदनाशामक गोळ्यांचा जास्त वापर नको
नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (एनएसएआयडी) वेदनाशामक म्हणजेच वेदना घालवणारे म्हणून काम करतात. पण आपल्याला माहिती नसते की, त्यांचा जास्त वापर किडनीला खूप लवकर खराब करू शकतो. तसे तर ज्यांना आधीच मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यायलाच हवी, त्यामुळं वेदनाशामक गोळ्यांचा नेहमी होणारा वापर कमी करा आणि फक्त डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसारच गोळ्या घ्या.
साखरेचे सेवन प्रमाणात करा
चहा असो की दुसरी गोड कोणतीही गोष्ट असो. आपण साखरेचा जास्त वापर करून आपला लठ्ठपणा वाढवत असतो ते समजून घेणं गरजेचं आहे. डायबिटीस, उच्च रक्तदाबाचा धोका देखील वाढत असतो. या दोन्ही रोगांमुळे एखाद्या व्यक्तीचे मूत्रपिंड खराब होण्याची शक्यता असते. म्हणून, आपण गोड बिस्किटे, जंक फूड किंवा ब्रेडसारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खाणे वेळीच कमी केले पाहिजे.
प्रक्रिया केलेले अन्न कमी प्रमाणात खा
घरातील पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. प्रक्रिया केलेले पदार्थ सोडियम आणि फॉस्फरसने भरलेले असतात, कुठे अजिनोमोटो तर कुठे टेस्टिंग पावडर सारख्या कित्येक टेस्टमेकरचा वापर बाहेरील पदार्थांत होतो, पण याचा शरीरावर होणार परिणाम अपायकारक असतो. म्हणून त्यांचे सेवन केल्याने आपल्या किडनीला मोठे नुकसान होऊ शकते. उच्च फॉस्फरस असलेले प्रक्रिया केलेले अन्न केवळ आपल्या मूत्रपिंडांना अपाय पोहोचवत नाही, तर ते आपल्या हाडांसाठी नुकसानकारक असते.
जेवणात मिठाचा अति वापर
घरी जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हाच त्यात योग्य प्रमाणात मीठ घालण्याची सवय लावा. नेहमीच मीठ कमी आहे म्हणून वरून वेगळं मीठ जेवणात घेणं टाळा, कारण उच्च सोडियम (मीठ) असलेला आहार रक्तदाब वाढवण्याचे काम करतो, ज्यामुळे किडनीशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच डॉक्टर जेवणात मीठ कमी वापरण्याची शिफारस करत असतात.
एकाच ठिकाणी खूप वेळ बसून काम
कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाले, ऑफिसमध्ये जाणं बंद झालं. घरून काम करणं म्हणजे अनेक छोट्या आजारांना निमंत्रण देणं सुरू होऊ लागलं. दिवसभर एकाच ठिकाणी बसून किंवा शरीर पूर्णपणे निष्क्रिय ठेवल्याने किडनीचे आजारही होऊ शकतात, हे आपल्याला माहीत हवं. म्हणून कसरती करा. रक्तदाब आणि चयापचय क्रिया योग्य ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा.
शरीराला हायड्रेटेड नाही ठेवलं तर..
दिवसभरात काही काम झाले नाही, थकवा व घामही आला नाही मग तहान लागली नाही, असे जाणवते. पण मग आपण पाणी कमी पितो तर त्याचे नुकसान आपल्याच शरीराला होते. तर त्याविरुद्ध पाणी पुरेसे पिले असता शरीर हायड्रेटेड होऊ विषारी घटक आणि जास्तीचे सोडियम बाहेर पडतात. पाणी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोकाही कमी होतो. डॉक्टर म्हणत असतात की, तुमच्या एका निरोगी व्यक्तीने दिवसातून सुमारे 4 ते 5 लिटर पाणी प्यायला हवे. यानुसार तुम्ही कमीत कमी किती पाणी प्यायला हवे हे बघा किंवा काहीही उपाय करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511