SpreadIt News | Digital Newspaper

चेन्नई सुपर किंग्स आयपीएलच्या चषकावर नाव कोरत ठरला ‘इतक्या’ कोटींचा मानकरी..

चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमीयर लीग 2021 चे विजेतेपद मिळवले आहे. शुक्रवारी (15 ऑक्टोबर) पार पडलेल्या फायनलमध्ये त्यांनी इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला.

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावाच करू शकला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेला हा सामना चेन्नईने 27 धावांनी जिंकला.

Advertisement

चेन्नईकडून फाफ डु प्लेसिसने 86, ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. शार्दुल ठाकूरने 3, जोश हेजलवूड, रवींद्र जडेजाने 2-2 विकेट, दीपक चहर आणि ड्वेन ब्रेबो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

विजेत्या संघाला किती कोटींचं बक्षीस?

Advertisement

▪️ अंतिम सामन्यात विजेतेपद मिळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला सर्वाधिक 20 कोटींचे बक्षीस मिळाले. अंतिम सामन्यातील सामनावीर फाफ डू प्लेसिसला 5 लाख रुपये बक्षीस मिळाले.

▪️ उपविजेत्या ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला 12.5 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले.

Advertisement

▪️ प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेले दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला 8.75 कोटींचे बक्षीस मिळाले.

खेळाडूंनीही पटकावले विविध पुरस्कार

Advertisement

▪️ ऑरेंज कॅप- ऋतुराज गायकवाड (635 धावा), चेन्नई सुपर किंग्स – 10 लाख रुपये

▪️ पर्पल कॅप- हर्षल पटेल (32 विकेट्स), रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – 10 लाख रुपये

Advertisement

▪️ सर्वाधिक षटकार – केएल राहुल (30 षटकार), पंजाब किंग्स – 10 लाख रुपये

▪️ एमर्जिंग प्लेअर- ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्स – 10 लाख रुपये

Advertisement

▪️ गेम चेंजर – हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – 10 लाख रुपये

▪️ सर्वोत्तम झेल – रवी बिश्नोई (सामना 21, फलंदाज – सुनील नारायण), पंजाब किंग्स – 10 लाख रुपये

Advertisement

▪️ व्हॅल्यूएबल प्लेअर- हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – 10 लाख रुपये

▪️ पॉवर प्लेअर – व्यंकटेश अय्यर, कोलकाता नाईट रायडर्स – 10 लाख रुपये

Advertisement

▪️ सुपर स्ट्रायकर ऑफ द सिजन – शिमरॉन हेटमायर, दिल्ली कॅपिटल्स – 10 लाख रुपये

▪️ फेअर प्ले अवॉर्ड- राजस्थान रॉयल्स – 10 लाख रुपये
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement