चाणक्यनीती: आयुष्यात ‘या’ गोष्टींचे पालन कराल, तर धनप्राप्ती व यश निश्चित; चाणक्यांनी सांगितलेले विचार वाचा..
चाणक्य नीतीतून आपल्याला अनेक दैनंदिन जीवनातील प्रश्नांची उत्तरे मिळतात. आचार्य चाणक्य हे एक हुशार व्यक्तिमत्व, कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य म्हटलं जाऊ लागलं. जाणून घेऊन आयुष्यात अनमोल बदल घडविण्यासाठी चाणक्यनीतीत काय सांगितलंय? वाचा..
▪️ नीतिशास्त्रामध्ये आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, ज्या रीतीने कापणे, घर्षण, उष्णता आणि मार सहन केल्यावर सोन्याची खरी परख होते. त्याचप्रकारे व्यक्तीची ओळखही अशाच गुणांच्या आधारे केली जाते.
▪️ व्यक्तीचे हेच गुण त्याचं आचरण दर्शवतात. यात त्यांनी व्यक्तीच्या अशा काही वाईट सवयींचा उल्लेख केलाय, ज्यामुळे आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाहीत. त्यामुळे वाईट सवयींपासून सर्वांनी स्वतःला दूर ठेवले पाहिजे.
▪️ असं म्हणतात की, वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही. गेलेला शब्द आणि गेलेली वेळ परत येत नाही आणि आणताही येत नसल्याने आपल्याला वेळेची किंमत कळते. आयुष्यात अनेक संघर्ष पेलून फक्त तेच लोक यशस्वी होतात ज्यांना वेळेची किंमत समजते. कोणतंही ध्येय तेव्हाच साध्य होतं जेव्हा एखादी व्यक्ती वेळेवर योग्य निर्णय घेऊन लगेच कामाला लागते.
▪️ जे लोक वेळेचा चांगला वापर म्हणजेच सदुपयोग करतात, ते लोक आपले लक्ष्य सहजरित्या साध्य करतात आणि संकट पार करतात. संकटं पार करूनच लक्ष्मी प्राप्त होत असते, हे लक्षात ठेवा.
▪️ आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं आपण फक्त ऐकूनच सोडून देतो. चाणक्य नीतिमध्ये आळस हा देखील मानवाच्या प्रगतीत सर्वात मोठा अडथळा असल्याचं चाणक्यांनी सांगितलंय. आपल्यापैकी जो व्यक्ती आळशी असेल, तो आलेल्या चांगल्या संधीचा फायदा घेत नाही, तर ही संधी पुन्हा येईन अशी वाट पाहतो आणि संधीस मुकतो.
▪️ आळशी व्यक्ती कोणतंही काम वेळेवर पूर्ण करत नाही आणि केलं तर तेही वेळेवर होत नाही. ज्यामुळे यश मिळण्यास बराच अवधी होतो. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन आळशीपणापासून दूर राहिले पाहिजे व ज्यांना कोणाला आळशीपणा फार आहे, त्यांच्यापासूनही दूरच बरे!
▪️ आचार्य चाणक्य सांगतात, ज्यांना मेहनत करायला भीती वाटते, त्यांनाही यश मिळत नाही. अशा लोकांकडे नेहमीच पैशांची कमतरता असते. कारण मेहनतीशिवाय यश व धनप्राप्ती शक्य नाही. म्हणून मेहनत करा.
▪️ आचार्य चाणक्य सांगतात, तुमचा खरा मित्र असेल तर त्याचा नेहमी आदर करा आणि त्याला तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. तुम्ही कोणाशीही मैत्री करण्याची कधीही घाई करू नये. असे केल्यास तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते
▪️विश्वास निर्माण करण्यास बराच वेळ लागतो, परंतु तो मोडण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. एकदा कोणाचा विश्वास तुटला की तो परत मिळवणे खूप कठीण असते. जे लोक तुमच्यासाठी काहीही करायला तयार असतात, तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीशी उभे राहतात, असे लोक खरोखर मौल्यवान असतात आणि तुमचे खरे मित्र असतात, त्यांना जपा.
▪️आयुष्यात कामात आक्रमकता आणि स्वभावात विनम्रता असली पाहिजे, असे चाणक्य म्हणतात. विनम्र व्यक्तीचे सारेच कौतुक करतात. नम्रतेने वागणाऱ्या, बोलणाऱ्याला प्रत्येक ठिकाणी मान-सन्मान मिळतो. प्रत्येकाने ही सवय अवलंबली पाहिजे.
▪️ आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे की स्वच्छतेची सवय असलेल्या व ज्या व्यक्ती स्वच्छतेची काळजी घेतात त्यांना यशप्राप्ती होते व त्या लोकांचे सारेच कौतुक करीत असतात.
▪️ चाणक्य नीती सांगते की, प्रत्येक व्यक्तीने स्वतःला नेहमी मादक पदार्थांपासून लांब ठेवले पाहिजे. कारण कोणत्याही प्रकारची नशा ती दारूची असो वा तत्सम काही पदार्थांची ती आपल्या आरोग्यावर आणि आपल्या मेंदूवर परिणाम करते. एखादी व्यक्ती सक्षम आणि कार्यक्षम असूनही चांगली कामगिरी करण्यापासून वंचित राहते. अंमली पदार्थांचे व्यसन केल्याने योग्य आणि अयोग्य गोष्टी ओळखता येत नाही. अशा लोकांवर सुद्धा आई लक्ष्मी कृपा करीत नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511