विजयादशमीनिमित्त बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव झाला. बाॅलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन हेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव असतात. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसह ब्लॉगद्वारे ते चाहत्यांशी संपर्कात असतात..
दरम्यान, सोशल मीडियावर दसऱ्याच्या शुभेच्छा पोस्ट करताना अमिताभ बच्चन यांच्याकडून नकळत एक चूक झाली. मग काय, ट्रोलर्सनी त्यांनाही सोडले नाही. अनेकांनी त्यांचा क्लास घेतला. मोठ्या मनाच्या अमिताभ यांनीही आपली चूक मान्य केली. नेमकं काय झालं होतं, याबाबत जाणून घेऊ या..
नेमकं काय झालं..?
अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या फेसबूक पेजवर त्यांनी ‘दशहेरा की अनेक अनेक शुभकामनाएँ…’ असे लिहिले. ‘बिग बीं’च्या या शुभेच्छांवर त्यांचे फॉलोअर राजेश कुमार यांना चूक आढळली. त्यांनी ती चूक लगेच दाखवून दिली.
राजेश कुमार यांनी लिहिलं, की ‘सर..! ‘खुदा गवाह’च्या एका सीनमध्ये तुम्ही ‘पेशेवर मुजरिम’ ऐवजी ‘पेशावर मुजरीम’ म्हणताना दिसता. तुम्ही एका महान कवींचे सुपूत्र आहात. ‘दशानन’मधून तयार झाला ‘दशहरा’ असा शब्द आहे, ‘दशहेरा’ नाही. जाहिराती बाजूला ठेवा, शुद्धलेखनाबद्दल सावधगिरी बाळगा. मनापासून अभिनंदन..!’
बिग बींनी माफी मागितली…
राजेश कुमार यांच्या या कमेंटनंतर अमिताभ बच्चन यांनीही आपली चूक मान्य केली. त्यांनी उत्तर देताना लिहिलं की, झालेल्या चुकीबद्दल मी दिलगीर आहे आणि मी ती चूक दुरुस्त करेन. मला त्याची जाणीव करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद…!
दरम्यान, त्यानंतर ट्रोलर्संनी बिग बींची शाळा घेतली. तर काहींनी चूक मान्य केल्याबद्दल बिग बींचे कौतुकही केले. आपली चूक मान्य करुन चाहत्यांना यापूर्वीही बिग बींनी प्रतिसाद दिला आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511