SpreadIt News | Digital Newspaper

🔯 आजचे राशिभविष्य (Horoscope): तुमचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या..

🗓️ शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

मेष (Aries) : नवरात्रात शुभ ग्रहांचं अतिशय गुप्त सहकार्य राहील. कोणाशी काहीही न बोलता प्रचिती घ्या. यंदाची विजयादशमी मोठा विजय नोंदवेल.

Advertisement

वृषभ (Taurus) : पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींचे व्यावसायिक उपक्रम गाजतील. तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखतींतून नोकरीची निश्‍चिती होईल.

मिथुन (Gemini) : सप्ताहात गाठीभेटींतून भाग्य उजळेल. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ होतील. मोठे आर्थिक निर्णय उद्यावर ढकलले तर बरे होईल.

Advertisement

कर्क (Cancer): आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकतो. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीस स्थान देऊ नका.

सिंह (Leo) : आज आर्थिक आवक उत्तम राहील. मुलांच्या मागण्या हौशीने पुरवाल. कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. दिवस चांगला आहे.

Advertisement

कन्या (Virgo): नोकरीत कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. आज काही मनाविरुद्ध घटना मनास बेचैन करतील. शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.

तूळ (Libra) : भावंडांचे मात्र आज एकमेकांना चांगले सहकार्य राहील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल. कदाचीत वाहन रस्त्यात रुसून बसेल.

Advertisement

वृश्चिक (Scorpio) : अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून लांब राहा.

धनु (Sagittarius) : कार्यक्षेत्रातील तुमच्या पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टिक्षेपात येतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आज काही रखडलेली किचकट कामेही मार्गी लागतील.

Advertisement

मकर (Capricorn) : दिवसाच्या उत्तरार्धात एखादा लाभ होईल. कुटुंबामध्ये या आठवड्यात वातावरण प्रसन्न असेल. चांगलं कार्य तुमच्या हातून पार पडेल.

कुंभ (Aquarius) : पदोन्नतीशी संबंधित चर्चा होईल. मुलांच्या कामाचा अभिमान वाटेल. कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण असेल. आरोग्याची काळजी घ्या.

Advertisement

मीन (Pisces) : दुसऱ्यासोबत चांगला व्यवहार करा. कामासाठी बाहेर जाण्याचे योग आहेत. गुंतवणूक करण्यासाठी पॉलिसीमध्ये प्रयत्न करू शकता.

Advertisement