SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सॲपवर दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी दसऱ्याचे स्टिकर्स कसे डाऊनलोड करायचे? वाचा..

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. 15 ऑक्टोबरला दसरा हा सण मोठ्या उत्साहात देशभर साजरा करण्यात येणार आहे. सध्या कोणताही सण आला की आपण आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया ॲप्सच्या माध्यमातून शुभेच्छा पाठवत असतो.

डिजिटल शुभेच्छा देण्यासाठी सर्वात जास्त वापर होतो तो व्हॉट्सॲपचा! त्यामुळे व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवण्याचंही प्रमाण अधिकच आहे. व्हॉट्सॲप हा ॲप देशातील व जगातील एक लोकप्रिय सोशल मीडिया ॲप आहे. देशातील लाखो लोकं या ॲपचा वापर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टिकर्स पाठवून, तसेच चॅट करण्यासाठीही स्टिकर्सचा वापर करतात. यासोबतच सणावारालाही ही ‘स्टिकर्स परंपरा’ तंतोतंत जपली जाते.

Advertisement

आज (ता. 15) विजयादशमी किंवा दसरा सणाच्या आपण सर्वांनाच शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सॲपवरुन ‘हॅपी दसरा 2021 स्टिकर्स’ पाठवू शकतात. व्हॉट्सॲपवर तुम्ही दसरा स्टिकर्स डाऊनलोड करू शकतात. चला तर मग सोप्या भाषेत आपण पाहू दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी स्टिकर्सचे ॲप ‘प्ले स्टोअर’ वरून कसे डाऊनलोड करायचे..

▪️ तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल आणि सर्च बारवर दसरा स्टिकर्स फॉर व्हॉट्सॲप टाईप करावे लागेल.

Advertisement

▪️ टाईप करून सर्च केलं की, तुम्हाला अनेक ॲप्स खाली आलेले दिसतील. त्यापैकी दसऱ्याच्या संबंधित एक ॲप तुम्ही आयकॉन पाहून निवडू शकता.

▪️ त्या ॲपवर एकदा क्लिक करून त्या ॲपविषयी संपूर्ण माहीती तुम्हाला दिसेल आणि ‘इंस्टॉल’ (Install) असं एक नाव (बटन) दिसेल.

Advertisement

▪️ आता तुम्ही त्या ‘Install’ पर्यायावर क्लिक करा त्यानंतर थोडं थांबा. आता तुम्हाला तिथे ते ॲप इंस्टॉल होताना (ते ॲप आता तुमच्या वापरण्यासाठी सज्ज होत आहे) दिसेल.

▪️ इंस्टॉलेशन पूर्ण झालं की, तिथे ‘ओपन’ (Open) असं नाव येईल तिथे क्लिक करून ते App तुम्ही उघडू शकता आणि आता तेथील स्टिकर्स पॅक तुम्हाला व्हॉट्सॲपमध्ये घेण्यासाठीचा पर्याय शोधून क्लिक करावं लागेल किंवा काही ॲप्समध्ये ‘ॲड टू व्हॉट्सॲप’ बटणावर टॅप करूनही तुम्हाला आवडणारा स्टिकर पॅक व्हॉट्सॲपमध्ये तुम्ही जोडू शकता.

Advertisement

▪️ आता शेवटचं म्हणजे व्हॉट्सॲप उघडून त्यामध्ये स्टिकर्स सेक्शनला जा, आणि तिथे तुम्हाला तुम्ही डाऊनलोड केलेले नवीन दसरा स्टिकर्स सापडतील. मेसेजिंग ॲपच्या स्टिकर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कधीही कोणताही स्टिकर पॅक काढून पाठवू शकता.

किंवा

Advertisement

तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून ते ॲप एकाच क्लिकवरही इंस्टॉल करू शकता 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ajwastickerapps.navratriwastickers.dussehrastickersforwhatsapp

▪️ एकदा तुम्ही ते ॲप तुमच्या फोनवर इंस्टॉल केले की उघडा आणि स्टार्ट बटण दाबा.

Advertisement

▪️ तुम्हाला या ॲपमध्ये दसरा आणि दिवाळीचे असे दोन सणाचे दोन्ही स्टिकर्स मिळतील. कोणत्याही हव्या त्या स्टिकर पॅकवर तुम्ही टॅप करू शकता.

▪️ आता तुम्ही ‘ॲड टू व्हॉट्सॲप’ बटणावर टॅप करून मेसेजिंग ॲपमध्ये तुम्हाला आवडणारा स्टिकर पॅक जोडू शकता. त्यात तुम्हाला ॲप पुन्हा ‘ADD’ बटणावर टॅप करण्यास सांगेल तिथे टॅप करा.

Advertisement

▪️ आता तुम्ही व्हॉट्सॲप उघडा आणि त्यात स्टिकर्स सेक्शनला जा, आणि तिथे तुम्हाला तुम्ही डाऊनलोड केलेले नवीन दसरा स्टिकर्स सापडतील. मेसेजिंग ॲपच्या स्टिकर्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कधीही कोणताही स्टिकर पॅक काढू शकता.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement