खुशखबर! एसबीआय देतेय कमी किंमतीत घर, दुकान, प्लॉट खरेदी करण्याची संधी, या ई-लिलावात सहभागी होण्यासाठी जाणून घ्या..
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI ) या बँकेने ई-लिलाव जाहीर केला आहे. या अंतर्गत मालमत्तेचा (प्रॉपर्टी) ग्राहकांना कमी किंमतीत लिलाव केला जाणार आहे. जर तुम्हीही घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मोठी संधी घेऊन आली आहे.
लिलावात सहभागी होण्याआधी समजून घ्या…
एसबीआयच्या अटी आणि शर्तींवर बोली यशस्वी झाल्यास मालमत्ता संबंधित ग्राहकाच्या सुपूर्द केली जाईल. सदर मालमत्ता ही निवासी घर किंवा व्यावसायिक मालमत्ता असू शकते. परंतु ही मालमत्ता बँक डिफॉल्टरच्या मालकीची आहे. कारण, असे अनेक वैयक्तिक कर्जदार किंवा खासगी कंपन्या बॅंकेकडून प्रॉपर्टीसाठी कर्ज घेतात परंतु ते वेळेवर परत करू शकत नाहीत. बँक अशा व्यक्ती किंवा कंपन्यांची मालमत्ता बँक ताब्यात घेते. तसेच ही मालमत्ता विकून बँक आपली थकबाकी वसूल करते. यासाठी बँकेकडून परवडणाऱ्या किमतीत मालमत्ता खरेदी करण्याची ऑफर दिली जाते.
मेगा ई-ऑक्शन (Mega E-Auction) कधी असणार?
एसबीआयचा हा मेगा लिलाव 25 ऑक्टोबरला सुरु करणार आहे. यामध्ये व्यावसायिक ते खासगी मालमत्ता खरेदी (Property auction) करण्याची संधी मिळणार आहे, एसबीआयनेच ट्वीट करून याची माहिती दिली आहे. तुम्ही ऑक्शनमध्ये भाग घेऊन चांगली बोली लावू शकता. ग्राहकांना कोणत्याही ब्रोकरेजशिवाय मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. तुम्ही या संधीचा उपयोग घरे, जमीनी, दुकाने बाजारापेक्षा कमी किंमतीत घेण्यासाठी करू शकता, असे एसबीआयने म्हटले आहे. या मालमत्ता कर्ज थकविलेल्या कर्जदारांच्या आहेत. त्या कर्जदारांनी गहाण ठेवल्या होत्या. यामध्ये दुकाने, घरे, इमारती व अन्य गोष्टी आहेत.
बँकेकडे गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलाव करण्याचा न्यायालयाचा आदेशही जोडण्यात आल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. लिलावात सहभागींसाठी सर्व संबंधित कागदपत्रे आणि माहिती, नोटीससह सर्व मालमत्तांचे क्षेत्र आणि इतर तपशील देण्यात आले आहेत.
मेगा ई-ऑक्शनमध्ये सहभागी कसं व्हायचं?
▪️ बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिलेल्या माहीतीनुसार, या ई-लिलावामध्ये अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल 👉 https://bank.sbi/web/sbi-in-the-news/auction-notices/bank-e-auctions
▪️ आपण वरील लिंकला भेट देऊन मालमत्तेचे तपशील तपासू शकता. तसेच वेबसाईटवर सर्वात खाली आवश्यक माहितीसाठी विविध लिंक्स दिल्या आहेत. त्यावर आपण क्लिक करून मेगा ई-ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकता व अधिक माहीती जाणून घेऊ शकता.
▪️ सर्वात आधी तुम्हाला जवळच्या स्टेट बँकेत जाऊन कागदपत्रे दाखल करावी लागतील. यानंतर तुम्हाला ऑक्शनचा युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल. तुमच्या ईमेल आयडीवर तो आलेला असेल. 25 ऑक्टोबरला लॉगिन केल्यावर अटी मान्य़ असल्याचे टिक करून सबमिटवर क्लिक करावे लागेल.
▪️ बोलीधारकांना केवायसी, ईएमडी आणि एफआरक्यू जो तुम्हाला बँकेत मिळेल तो अपलोड करावा लागेल. यानंतर तुम्हाला बोलीची प्रारंभिक रक्कम जमा करावी लागेल. अंतिम बोली लावण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करावे. यानंतर पुन्हा अंतिम सबमिटवर क्लिक करावे. अंतिम सबमिट बटन क्लिक न झाल्य़ास तुम्ही लिलावात भाग घेऊ शकणार नाही. अशावेळी अधिक माहितीसाठी बँकेशी संपर्क साधावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511