ऑस्ट्रेलिया आणि आरसीबी (RCB)चा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwel) लवकरच भारताचा जावई होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. एका भारतीय वंशाच्या मुलीसोबत त्याने ‘साता जन्माच्या गाठी’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
विनी रमन (Vini Raman) असे या मुलीचे नाव आहे. मॅक्सवेल व विनी 2017 पासून एकमेकांना डेट करतात. काही महिन्यांपूर्वी ते एकत्र युरोप टूरवरही गेले होते. 2019 च्या सुरुवातीला झालेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पुरस्कार कार्यक्रमातही ही जोडी एकत्र होती.
मानसिक कारणांमुळे 2019 मध्ये मॅक्सवेलने काही काळासाठी क्रिकेटपासून ‘ब्रेक’ घेतला होता. त्यावेळी वाईट कालखंडातून बाहेर काढण्यासाठी विनीनेच त्याला मदत केल्याचा खुलासा खुद्द मॅक्सवेलने केला होता.
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
मागच्या वर्षी (2020) भारतीय रितीरिवाजानुसार मॅक्सवेल व विनीचा साखरपुडा झाला होता. या कार्यक्रमासाठी दोन्ही कुटुंबांतील सदस्य व त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. त्यांनी साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.
कोण आहे विनी रमण..?
भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये राहते. इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती ‘फार्मासिस्ट’ असल्याचे समजते. मॅक्सवेलने गेल्या वर्षीच विनीला लग्नासाठी ‘प्रपोज’ केले होते. त्याला विनीनेही होकार दिला होता, मात्र नंतर काही कारणांनी त्यांचे लग्न लांबणीवर गेले.
मॅक्सवेलचा काल (14 ऑक्टोबर) वाढदिवस झाला. त्याच दिवशी विनीनं इन्स्टाग्राम स्टोरीतून जाहीर केलं, की “मॅक्सवेल वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. तुझ्याशी लग्न करण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही.. 2022 हे आपलं वर्ष असेल..!”
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511