मनी हाईस्ट नेटफ्लिक्सवरची सर्वाधिक लोकप्रिय सीरीजमधील एक आहे. मनी हाईस्टच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने बुधवारी मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनच्या दुसऱ्या भागाचा टीजर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेटफ्लिक्सने पाचव्या सीजनचा पहिला भाग याआधी प्रदर्शित करताना म्हटलं होतं की, ‘मनी हाईस्टचा शेवटचा सीजन हा दोन भागांमध्ये रिलीज केला जाणार आहे. पाचव्या सीजनचा पहिला भाग प्रदर्शित झालेलाच आहे. दुसऱ्या भागाचा हा व्हिडीओ यू-ट्यूबवर शेअर होताच प्रचंड व्हायरल झालेला आहे.
मनी हाईस्ट सीजन-5 चा दुसरा भाग 3 डिसेंबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सीरीजचे चारही सीजन नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या सीरीजचा 5 वा सीझन खूप मनोरंजक, भावनिक आणि सिरीयस दाखवला आहे. सर्वच जण अनेक संकटांना सामोरं जात आहेत. एकेक जण जखमी होत असताना हा शेवटचा भाग असेल आणि प्रोफेसर हा शेवटचा डाव जिंकेल की हारेल हे समजणार आहे. टिझर रीलीज होताच चाहते सीरीज पाहण्यासाठी चांगलेच उत्सुक झाले आहेत.
टीजरच्या सुरुवातीलाच चोरीचा मास्टर माईंड प्रोफेसर बोलत आहेत,”मागील काही तासांत मी माझ्या जवळच्या लोकांना गमावले आहे. त्यामुळेच मी या चोरीसाठी आणखी कोणाला मरू देणार नाही” हा टीजर 42 सेंकदाचा आहे. या सीरीजमधील 5 व्या सीजनच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक वाट बघत आहेत. हा या सीरीजचा शेवटचा भाग असणार आहे. प्रेक्षकांना या वेब सीरीजची प्रचंड उत्सुकता आहे.
मनी हाईस्टच्या पाचव्या सीजनच्या दुसऱ्या भागाचा टिझर:
प्रोफेसरची भूमिका कशी मिळाली?
प्रोफेसरच्या भूमिकेसाठी अल्वारो मोर्टेने पाच वेळा ऑडिशन दिली, ज्यासाठी अल्वारो मोर्टेचे सर्वांनी कौतुक केले होते. अहवालांनुसार, अल्वारोने दोन महिन्यांत पाच वेळा ऑडिशन दिली आणि तो पाचव्या प्रयत्नात सफल झाला. अल्वारो मोर्टेच्या कारकिर्दीसाठी पैसा हा एक मोठा टर्निंग पॉईंट आहे.अल्वारोचे जीवन आणि करिअर या दोन्हीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या सीरीजमुळे अभिनेत्याला केवळ स्पेनमध्येच नाही तर, जगातील अनेक देशांमध्येही प्रसिद्ध मिळाली आहे. अगदी बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना यानेही प्राध्यापकाची भूमिका करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
मनी हाईस्ट सीरीज कशी ठरली हिट ?
एका अहवालानुसार, लॉकडाऊनमुळे या सीरीजला खूप फायदा झाला आहे. खरं तर, लॉकडाऊन दरम्यान ‘मनी हाईस्ट’ वेबसिरिजचा तिसरा आणि चौथा सीझन प्रदर्शित झाला त्यावेळीच लोक ओटीटीवर सीरीज पाहण्यात अधिक व्यस्त होते आणि याचं एकमेव कारण म्हणजे थिएटर बंद होते. प्रेक्षकांनी ही सीरिज पाहिली आणि प्रत्येकाला ती खूप आवडली. कोरोना काळादरम्यान सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरीजमध्ये ‘मनी हाईस्ट’चा देखील समावेश आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511