SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची नवीन जर्सी लॉंच; नवीन जर्सी कशी असेल, पाहा..

आगामी टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) काही दिवसांपूर्वीच संघ जाहीर केला. तत्पूर्वी UAE मध्ये टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी टीम इंडियाला नवीन जर्सी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट संघाने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार आगामी टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिया नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. नुकतेच संघातील खेळाडूंनी ही जर्सी घातलेले फोटोही बीसीसीआयने पोस्ट केले आहेत. ही जर्सी ‘एमपीएल स्पोर्ट्स’ने लॉंच केली असून तेच यंदा भारतीय संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर आहेत.

Advertisement

बीसीसीआयने याबद्दलची माहिती देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “या जर्सीचे रंग हे करोडो भारतीय फॅन्स जे संघाला चिअर करतात. त्यांना पाहून तयार करण्यात आली आहे.’ या जर्सीला ‘बिलियन चियर्स जर्सी’ असं नावही दिलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासोबत भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू दिसत आहेत.

नवीन जर्सी कशी आहे?

Advertisement

भारतीय संघाची ही नवीकोरी जर्सी आधीच्या जर्सीपेक्षा काहीशी वेगळी आहे. आजपर्यंत भारतीय संघातील खेळाडू जी जर्सी घालत होते, ती निळ्या रंगाची होती, ही नवी जर्सीपण निळ्या रंगाचीच आहे, पण जर्सीवरील डिझाईन जास्त आकर्षक व वेगळं आहे. या जर्सीवर निळ्या रंगाचे पट्टे आहेत. सध्या भारतीय संघ घालत असलेल्या गडद निळ्या रंगासारखीच या जर्सीचा रंगही गडद आहे. पूर्वी भारतीय खेळाडू आकाशी कलरच्याच जर्सी घालत असे, पण अलीकडच्या काळात गडद रंगाच्या जर्सी घालू लागला आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

Advertisement

भारत (India): विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

▪️ राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल
▪️ भारतीय संघाला सरावात मदत करणारे खेळाडू – आवेश खान, उम्रान मलिक, हर्षल पटेल, लुकमन मेरीवाला, वेंकटेश अय्यर, कर्ण शर्मा, शाहबाज अहमद, के गौथम.

Advertisement

भारताचे विश्वचषकातील सामने

▪️ 24 ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
▪️ 31 ऑक्टोबर – भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
▪️ 3 नोव्हेंबर – भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
▪️ 5 नोव्हेंबर – भारत वि. ब गटातील अव्वल, दुबई, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
▪️ 8 नोव्हेंबर – भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
▪️ उपांत्य फेरीचे सामने -10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
▪️ अंतिम सामना – 14 नोव्हेंबर, वेळ- सायंकाळी 7.30 वाजता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement