SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फेसबूकवर नेते-अभिनेत्यांची खिल्ली उडविणे महागात पडणार, कंपनीने केले आणखी कठोर नियम, काय कारवाई होणार..?

सोशल मीडिया.. कुठलेही मत सहजरीत्या व्यक्त करण्याचे एक प्रभावी माध्यम.. मात्र, कधी कधी याच माध्यमामुळे सामाजिक शांतता, स्थैर्य धोक्यात येते. सामाजिक अस्थिरता जाणवू लागते. काही जण कृतीपेक्षा मतांवर जास्त भरवसा ठेवतात नि मग समस्या सुरु होतात.

सोशल मीडियातून अगदी कोणावरही सहज चिखलफेक केली जाते. मात्र, आता फेसबुकने (Facebook) त्यांच्या पॉलिसीत बदल केलाय. त्यामुळे फेसबुक वापरताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

Advertisement

अनेकदा बॉलिवूड, क्रिकेटर अन् राजकीय नेत्यांचे ‘मीम्स’ बनवून युजर्स सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र, आता अशा प्रकारे कोणाची खिल्ली उडविणे युजर्सला महागात पडू शकतं.

आतापर्यंत ‘सेक्सुअल व्हिजुवल्स’ असणाऱ्या अनेक ‘पोस्ट’ फेसबुकने हटविल्या आहेत. शिवाय पब्लिक फिगर असणारे सेलिब्रेटी, नेते, क्रिकेटर नि पत्रकारांना टार्गेट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे जाहीर केलंय. यूजरचे प्रोफाइल, पेज, अथवा ग्रूप कायमचा बॅन होण्याची शक्यता आहे.

Advertisement

‘फेसबुक’चे ग्लोबल सेफ्टी हेड एंटिगोन डेविस यांनी एक ब्लॉग पोस्ट केला आहे. त्यात एखाद्याची प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कठोर बंधने आणणार असल्याचं म्हटलं आहे. पब्लिक फिगर नि खासगी व्यक्तींवरील चर्चांवर लक्ष ठेवले जाईल. मात्र, त्याच वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सेलिब्रेटींची यादी बनविणार
सार्वजनिकरित्या एखाद्याला टार्गेट करणाऱ्या ‘पोस्ट’ फेसबूक हटविणार आहे. इनबॉक्समध्ये थेट मेसेज पाठविण्याच्या नियमांतही बदल होणार आहे. प्रोफाईल नि पोस्टवर कमेंट सुरक्षित ठेवले जाईल. कंपनी सेलिब्रेटी, प्रसिद्ध लोकांची यादी बनविणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सोशल मीडियावर द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट विरोधात काम करणाऱ्या टीमच्या सर्व सदस्यांना बदललं आहे. फेसबुकने डिसेंबर २०२० मध्ये या टीमला हटवलं होतं. कंपनीने इन्स्टा आणि फेसबुकचा युवकांवर कसा नकारात्मक परिणाम होतो, याचा इंटरनेट सर्व्हेही लपविला होता.

१२५९ पेज व ग्रूपवर बंदी
दरम्यान, फेसबुकने आतापर्यंत १२५९ पेज व ग्रूपवर बंदी घातलीय. त्यात इराणमधील ९३ अकाऊंट, १४ पेज, १५ ग्रुप आणि १९४ इन्स्टाग्राम हटविले. सूडान नि इराण येथील दोन नेटवर्क हटविले. सूडानमध्ये फेसबूकने ११६ पेज, ६६६ फेसबूक अकाऊंट आणि ६९ ग्रुप, ९२ इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले आहेत.

Advertisement

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement