SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महत्वाची बातमी: तुमच्या बँक खात्यात पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता कधी जमा होणार? जाणून घ्या..

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पाठवला जाणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 10 वा हप्ता खात्यावर जमा झाला होता; मात्र यंदाच्या वर्षी दिवाळीमुळे दहावा हप्ता कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत केवळ अंदाज मांडले जायचे, पण आता हा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. वर्षाखेरीस जमा होणारा हा हप्ता दहावा असून यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्याने काहीसा आधार मिळणार आहे.

Advertisement

पैसे कधी जमा होणार?

यंदा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता 15 डिसेंबर 2021 रोजी या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमार्फत प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात.

Advertisement

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता 15 डिसेंबर 2021 पर्यंत जमा करण्याचा सरकारचा विचार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी सरकारने शेतकऱ्यांना पैसे खात्यावर वर्ग केले होते.

योजनेस पात्र शेतकरी अशी करू शकतात नोंदणी

Advertisement

▪️ तुम्हाला आधी पीएम किसानच्या 👉 https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

▪️आता खालच्या बाजूस तुम्हाला ‘फार्मर्स’ कॉर्नर दिसेल. (Farmers Corner)

Advertisement

▪️ येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ (New Farmer Registration) या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

▪️ यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.

Advertisement

▪️ त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे.

▪️ आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे.

Advertisement

▪️ बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल.

▪️ त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement