इंधन दरवाढीमुळे आता अनेक नागरिकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे, आता आवड नव्हे, तर गरज बनली आहे. सणासुदीच्या मुहुर्तावर गाडी खरेदीचा विचार असल्यास ईलेक्ट्रिक गाड्या चांगली चाॅईस ठरु शकतो..
पेट्रोलच्या भावाने शंभरी कधीच ओलांडली आहे. त्यामुळे सध्या इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. आताच्या परिस्थितीत बाजारात कोणत्या इलेक्ट्रिक गाड्या उपलब्ध आहेत, त्यांची किंमत किती, त्यांची फिचर्स जाणून घेऊ या..
ओला एस-वन (Ola S1)
ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी अनेकांनी बुकिंग केलेले आहे. थाेड्याच काळात ही स्कूटर ग्राहकांच्या आवडीस उतरली आहे. ओलाने S1 आणि S1 pro स्कूटर लॉन्च केल्या आहेत. या स्कूटरची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या..
किंमत- 99999 रुपयांपासून
ड्रायव्हिंग रेंज- 121 किमी, तर S1 pro स्कूटर- 180 किमीपर्यंत रेंज
90 किमी प्रति तास वेग
18 मिनिटांत 75 किमी धावेल
सिम्पल वन (Simple One)
देशातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर
95 सेकंदात 40 किलोमीटर वेग पकडू शकते.
सर्वाधिक वेग 105 किमी प्रति तास
सिंगल चार्ज 236 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज
हिरो ऑप्टिमा (Hero optima)
सर्वाधिक विक्री झालेली स्कूटर.
डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलॅम्प, अॅंटी थेप्ट अलार्म
सर्वाधिक वेग 42 किमी प्रति तास
एका चार्चमध्ये 82 किलोमीटर रेंज
दिल्ली एक्स- शोरूम किंमत- 61640 रुपये
बजाज चेतक (Bajaj chetak)
जवळपास दोन दशकांनी बजाज चेतक पुन्हा एकदा इलेक्ट्रिक अवतारात भारतीय बाजारात.
किंमत- एक लाख रुपये.
फुल चार्जनंतर 90 किमी रेंज.
पाच तासांत शंभर टक्के चार्ज
टीव्हीएस क्यूब (TVS iQube)
टीव्हीएस कंपनीच्या क्यूबला मोठी मागणी
किंमत 1,00,777 रुपये.
4.2 सेकंदात 40 किमी प्रति तास वेग पकडते
एका चार्जमध्ये 75 किमी चालते
अथर 450x (Ather 450x)
सध्या इलेक्ट्रिक स्कूटरमधील बेस्ट सेलर स्कूटर.
रेंज 116 किमी
साडेतीन तासात 80 टक्के चार्ज
ओलाप्रमाणे स्कूटरला रिव्हर्स गिअर
किंमत- 1.32 लाखांपासून सुरु
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511