SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अबब.. 28 रुपयांच्या गुंतवणुकीवर 4 लाखांपर्यंत फायदा, कॅनरा बॅंकेची खास योजना, जाणून घेण्यासाठी वाचा..!

केंद्र सरकार आपल्या सरकारी योजना विविध बॅंकांच्या माध्यमातून राबवित असतात. बऱ्याचदा सर्वसामान्य माणसांना त्याबाबत माहिती नसल्याने अशा याेजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज असल्याचे दिसते.

मोदी सरकारच्या अशाच महत्वाच्या योजनेबाबत आपण जाणून घेणार आहोत. कॅनरा बँके (Canara bank) मार्फत ही योजना राबविली जातेय. या भन्नाट योजनेत तुम्ही दरमहा केवळ 28.5 रुपये जमा करून, तब्बल 4 लाखांपर्यंतचा फायदा मिळवू शकता.

Advertisement

कॅनरा बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन या योजनांबाबत माहिती दिलीय. ही नेमकी योजना काय आहे, तिचा कसा लाभ घेता येईल, त्यासाठी काय करायला लागेल, याबाबत जाणून घेऊ..

नेमकी योजना काय..?
मोदी सरकारने काही दिवसांपूर्वीच दोन योजनांची घोषणा केली होती. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अशी या दोन योजनांची नावे आहेत. चार लाखांपर्यंत फायदा मिळविण्यासाठी तुम्हाला या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या या दोन्ही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जादा पैसे मोजावे लागणार नाहीत. अगदी कमी पैशांत, म्हणजेच या दोन्ही योजनांसाठी वर्षाला एकूण 342 रुपये जमा करावे लागतील. महिन्याच्या हिशेबाने केवळ 28.5 रुपये जमा करून तुम्ही 4 लाखांपर्यंत लाभ मिळवू शकता.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी(Jeevan Jyoti Beema Yojana) 330 रुपये वार्षिक हप्ता आहे. या योजनेत आयुर्विमा मिळेल. म्हणजेच, या योजनेअंतर्गत विमा उतरविलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये मिळतात. तुमच्या बँक खात्यातून ‘ईसीएस’मार्फत ही रक्कम घेतली जाते.

Advertisement

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
केंद्र सरकारच्या दुसऱ्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत (PM Suraksha Beema Yojana) अगदी कमी हप्त्यात दोन लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या योजनेचा हप्ता केवळ १२ रुपये आहे. या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी वर्षाला फक्त 342 रुपये जमा करावे लागणार आहेत.

अन्य योजनांबाबत..
केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (Atal Pension Yojana) कमी गुंतवणुकीत जास्त परतावा मिळू शकतो. या योजनेत दरमहा 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शनही मिळणार आहे. या योजनेसाठी 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती आपले नाव नोंदवू शकते.

Advertisement

तसेच बॅंकेत जनधन खात असल्यास बॅंकेकडून दोन लाख रुपयांपर्यंत अपघाती विमाही मोफत मिळू शकतो. याशिवाय मोदी सरकारच्या विविध याेजना आहेत, ज्याद्वारे नागरिकांचा मोठा फायदा होऊ शकतो..

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement