SpreadIt News | Digital Newspaper

ठाकरे सरकारचा निर्णयांचा धडाका..! पूरग्रस्त शेतकरी, कलाकार, शिक्षकांबाबत विविध निर्णय..

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला. पूरग्रस्तांना दिलासा देतानाच, अन्य समाज घटकांसाठीही ठाकरे सरकारने आज अनेक निर्णय घेतले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची ही बैठक झाली. त्यात नेमके कोणते निर्णय घेण्यात आले, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

ठाकरे सरकारचे मोठे निर्णय

पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज
राज्याच्या विविध भागात जून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्याचा सुमारे ५५ लाख हेक्टर शेतीला फटका बसला आहे. अशा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषांची वाट न पाहता 10 हजार कोटींचे पॅकेज ठाकरे सरकारने जाहीर केले.

Advertisement

जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाणार आहे. मात्र, २ हेक्टर मर्यादेतच ती असेल.

पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत..
मंत्रीमंडळाच्या बैठकीत पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी आवश्यकतेनुसार ज्येष्ठ विधिज्ञांची विशेष समुपदेशी म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक योजना
केंद्र पुरस्कृत मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजना राज्यात राबविण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. योजनेच्या 13 कोटी 70 लाख रुपये खर्चासही मंजूरी देण्यात आली.

मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार आहेत. त्यादृष्टीने सामाजिक न्याय विभागामार्फत ही कृती योजना राज्यात राबविली जाणार आहे.

Advertisement

सहकारातील नियमित सदस्यांना संरक्षण
कोविडमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियमित सदस्यांना संरक्षण देण्यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बिगर नेट-सेट अध्यापकांना निवृत्तीवेतन
राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील बिगर सेट-नेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय झाला. 23 ऑक्टोबर 1992 ते 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त अध्यापकांना हे निवृत्तीवेतन देण्यात येईल.

Advertisement

कलाकारांना आर्थिक साहाय्य
राज्यातील 56,000 एकल कलावंतांना 5 हजार रुपयांप्रमाणे 28 कोटी, तर प्रयोगात्मक कला क्षेत्रातील 847 संस्थांना 6 कोटी, असे एकूण रुपये 34 कोटी आर्थिक सहाय्य देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement