बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सलमान एका वर्षात जास्त चित्रपट करत नसला तरी दरवर्षी एखाद्या ठराविक सणाच्या दिवशी त्याचा एखादा हटके चित्रपट नक्कीच प्रदर्शित होतो. त्यामुळेच चाहते सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ (Antim: The Final Truth) चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आणि सलमान खानचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. सलमानने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
या चित्रपटात सलमानची बहीण अर्पिताचा पती अर्थातच अभिनेता आयुष शर्मासुद्धा दमदार भूमिकेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं आम्ही आधीच आपल्याला सांगितलं होतं. त्यांनतर चाहत्यांना चित्रपटाच्या रिलीज डेटची प्रतीक्षा लागून होती. आता ही प्रतीक्षा देखील संपली आहे.
सलमान खानने स्वतःच सांगितलं, कधी होणार रिलीज..
अभिनेता सलमान खानने नुकताच ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे. तो म्हणाला की, “अंतिम:द फायनल ट्रुथ’ जगभरातील चित्रपटगृहात यावर्षी 26 नोव्हेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे. झी आणि पुनीत गोयंकासोबत आमचं एक दिमाखदार असोसिएशन आहे. अलीकडच्या काही वर्षांत आम्ही अनेक चित्रपट जसे की – रेस 3, लवयात्री, भारत, डी-3, राधे आणि आता अंतिम चित्रपट त्यांच्यासोबत केला आहे”, असं सलमान म्हणाला आहे.
AdvertisementView this post on InstagramAdvertisement
आयुष शर्माचा एक वेगळा अंदाज या चित्रपटातुन पाहायला मिळणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ चित्रपटामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे.
सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात अभिनेता आयुष शर्मा देखील कणखर भूमिका साकारणार आहे. अंतिम : द फायनल ट्रुथ या चित्रपटाचे दिग्दर्शन चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात सलमान खान एका धाडसी पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एक्शनने भरलेला असणार आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा बहुप्रतीक्षित आगामी चित्रपट आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511