SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

चेन्नई सुपर किंग्जवर फिक्सिंगचा आरोप? नेमकं ‘त्या’ मॅचमध्ये काय झालं, वाचा..

दिल्ली विरुद्ध चेन्नई सामन्यात विजयासाठी ठेवलेले 173 धावांचे आव्हान पार करताना सुरुवातीला चेन्नईला फाफ डुप्लेसीच्या बाद होण्याने फटका बसला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड व रॉबिन उथप्पा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 110 धावांची भागीदारी केली. हे दोघे खेळपट्टीवर असताना चेन्नईचा विजय सोपा वाटत होता. मात्र, अर्धशतक झाल्यावर उथप्पा बाद झाला. ऋतुराजनेही अर्धशतकी पल्ला पार केला.

चेन्नई सुपर किंग्सवर फिक्सिंगचा आरोप?

Advertisement

सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पा यांच्या शतकी भागिदारीनंतर कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या 6 चेंडूतील नाबाद 18 धावांच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने नवव्यांदा आयपीएलच्या (IPL) फायनलमध्ये प्रवेश केला.

चेन्नईच्या (CSK) विजयानंतर एका बाजूला त्याचे चाहते खुश असताना दुसऱ्या बाजूला सीएसकेवर एक धक्कादायक आरोप केला जात आहे. आयपीएलमध्ये याआधी फिक्सिंगमुळे चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आज पुन्हा असे आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.

Advertisement

सामना संपल्यानंतर सामन्यातील काही क्षणांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पसरण्यास सुरुवात झाली. असे करून नंतर ट्विटरवर चेन्नईच्या संघाच्या विजयानंतर ‘fixerkings’ चा ट्रेंड सुरू झाला आणि मग हा हॅशटॅग खूप जणांनी वापरण्यास सुरुवात केली. याआधीच चेन्नईला 2 वर्ष याच प्रकरणामुळे आयपीएलपासून लांब राहावे लागले होते. आता होणाऱ्या या उलटसुलट चर्चांमुळेही चेन्नईच्या संघाला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

फिक्सिंगचा आरोप कशामुळे?

Advertisement

यंदाच्या सीझनमध्ये भरभक्कम समजली जाणारी दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी सुरू झाली असताना चेन्नईच्या संघाकडून शार्दूर ठाकूरने 16वे षटक टाकले. या षटकामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत स्ट्राईकवर असताना अंपायरने सहावा चेंडू वाइड दिला.

आता शार्दूलने टाकलेला हा चेंडू ऑफ साईडच्या बाहेर फेकलेला होता त्यामुळे अंपायरने तो वाइड दिला. मग या निर्णयावर शार्दूल नाराज झाला की चेंडू वाईड टाकला गेला. पण त्यावेळी मैदानावर असलेल्या धोनीने शार्दुलचं षटक संपल्यावर अंपायरकडे जाब विचारला. या घटनेवरून सोशल मीडियावर संबंधित ट्रेंड सुरू होऊन फिक्सिंगचीच चर्चा सुरू झाली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement