SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्मार्टफोन खरेदी करण्याआधी तुमचा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आहे की वॉटर रेसिस्टेंट, नक्की जाणून घ्या..

जगातील बहुतेक स्मार्टफोन विक्रेते बरेच आकर्षक फीचर्स सांगून आपल्याला लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोन खरेदीसाठी आकर्षित करत असतात. विविध प्रकारचे ऑफर्स, विविध फीचर्स असलेले हजारो स्मार्टफोन आपण खरेदी करत असतो.

स्मार्टफोन घेताना सर्वात महत्वाचं फिचर आपण विसरतो ते म्हणजे वॉटर रेसिस्टेंट, वॉटरप्रुफ किंवा डस्ट रेसिस्टेंट. यात वॉटर रेसिस्टेंट, वॉटरप्रुफ किंवा डस्ट रेसिस्टेंट (धुळीपासून संरक्षण), वॉटर रिपेलेंट स्मार्टफोन येतात. वेगवेगळ्या स्मार्टफोनमध्ये त्या त्या कंपनीकडून वेगवेगळ्या आणि आकर्षक सुविधा दिल्या जातात.

Advertisement

मागच्या वर्षी iPhone 12 मध्ये वॉटर रेसिस्टेंट असल्याचा दावा चुकीचा ठरल्याने इटलीमध्ये Apple (ॲपल) कंपनीवर कोट्यवधी रुपयांचा दंड लावण्यात आला होता. यासाठी वॉटरप्रुफ स्मार्टफोन आणि वॉटर रेसिस्टेंट यात नेमका फरक काय? जाणून घेऊ….

वॉटरप्रुफ स्मार्टफोन व वॉटर रेसिस्टेंट मधील फरक

Advertisement

वॉटर रेसिस्टेंट (Water Resistant): वॉटर रेसिस्टेंट म्हणजे म्हणजे वॉटरप्रुफ नाही. वॉटर रेसिस्टेंट म्हणजे तुमच्या फोनमध्ये पाणी आत जाणं किंवा पाणी आत घुसणं अवघड आहे. समजा पाण्याचे किंवा द्रव पदार्थांचे काही थेंब फोनवर पडलेच तर, फोनच्या आतमध्ये ते थेंब न गेल्याने नुकसान जवळजवळ होऊ शकत नाही. पण जर असा स्मार्टफोन पाण्यात बुडाला तर त्याला नुकसान होण्याची शक्यता जास्त असू शकते. फोन संपूर्ण पाण्यात पडला तर तो फक्त Water Resistant असल्याने त्याला नुकसान होऊ शकतं.

वॉटर रिपेलेंट (Water Repellent): जर तुमचा फोन वॉटर रिपेलेंटयुक्त असेल, तर आपण त्याचा अर्थ असा घ्या की, तुमच्या स्मार्टफोनच्या वरच्या बाजूला एक पातळ लेयर (किंवा आवरण) लावली गेली आहे, फोनच्या त्या लेयरच्या आत पाणी जाऊ दिलं जात नाही. अशा स्मार्टफोनमध्ये ही लेयर आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूला लावलेली असते. यासाठी खूप कंपन्या हायड्रोफोबिक पृष्ठभाग तयार करतात आणि पाण्यापासून जास्तीत जास्त बचाव करण्यासाठी ते लावतात.

Advertisement

वॉटरप्रुफ (Water Proof): वॉटरप्रुफ हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल, तुमच्या कानी बऱ्याचदा पडलेल्या या शब्दाचं महत्व बऱ्याच वस्तूंसाठी मोठं आहे. अनेक वस्तू जसे की, तुमचा वॉटरप्रुफ असल्याचा दावा कंपनीने केला असल्यास, याचा अर्थ फोन पाण्यातही सुरक्षित राहील. अशा फोनचा वापर पाण्यातही करता येतो. तसंच पाण्यात फोटोग्राफीही करता येते. म्हणजेच सरळसरळ सांगायचं झालं तर हे एक कमालीचं फिचर आहे, ज्यात आपण स्मार्टफोन पाण्यातही वापरू शकतो. म्हणून या 3 फिचर्सविषयी अधिक माहीती घेऊनच स्मार्टफोन घेणं आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement