अभिजात सौंदर्याची खाण म्हणजे रेखा.. आपल्या सदाबहार अभिनयाने नि सौंदर्याने रेखाने लाखो प्रेक्षकांना भुरळ घातली. या सदाबहार बॉलिवूड अभिनेत्रीचा नुकताच वाढदिवस साजरा झाला.
खरं तर रेखा यांचे संपूर्ण आयुष्य, म्हणजे एक आख्यायिकाच.. त्यांच्या अभिनयाची, त्यांच्या सौंदर्याची जितकी चर्चा झाली नसेल, तितकी ती त्यांच्या खासगी आयुष्याची झाली. संघर्ष हा जणू त्यांच्या पाचवीलाच पूजलेला होता. मात्र, प्रत्येक संकटावर त्यांनी यशस्वीपणे मात केली.
आजतागायत रेखा नावाचं कोडं कुणालाच पूर्णपणे उलगडलेलं नाही. मात्र, आपल्या सावळ्या रंगामुळे सुरुवातीला रेखाला संधी द्यायला निर्माते तयार नव्हते. मात्र, त्यांनी हार मानली नाही. अखेर ‘दो अंजाने’ सिनेमातून त्यांनी बाॅलिवूडमध्ये अशी एंट्री केली, की नंतर त्यांना मागे वळून पाहावेच लागले नाही.
गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून रेखा दूरावल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांना सहसा त्यांचे दर्शन होत नाही. मात्र, कधी त्यांची झलक दिसलीच, तर त्यांचा राजेशाही थाट पाहून अनेकांचे डोळे पांढरे होतात.
रेखा आता कुठेच काही काम करीत नाहीत, मग त्यांच्या कमाईचे साधन काय? असा प्रश्न कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग याबाबत जाणून घेऊ या..
रेखाची संपत्ती किती..?
एका रिपोर्टनुसार, एकूण 40 मिलियन डॉलर, म्हणजेच सुमारे 25 अब्ज रूपये संपत्तीच्या मालकीण रेखा आहेत. आज जरी त्या सिनेमात दिसत नसल्या, तरी वर्षाला त्या सुमारे 65 लाख रूपये कमावतात. वांद्रे भागात त्यांचा अलिशान बंगला असून, त्याची किंमतच कोट्यवधीच्या घरात आहे.
आलिशान गाड्यांची रेखा यांना खूप आवड आहे. त्यांच्याकडे Land Rover Discovery, BMW 3 Series, Mitsubishi Outlander, Tata Nexa अशा महागड्या गाड्यांचा ताफा आहे.
अनेक पुरस्कार सोहळे, टीव्ही शो, उद्घाटन कार्यक्रमासाठी त्या हजेरी लावतात. मात्र, त्यासाठी त्या गलेलठ्ठ मानधन घेतात. हाच त्यांच्या सध्याचा इन्कम सोर्स आहे.
अलीकडेच ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेचा प्रोमो शूट करण्यासाठी रेखा यांनी 1 मिनिटांच्या शॉटसाठी सुमारे 5 ते 7 कोटी रूपये मानधन घेतल्याची चर्चा होती. ‘बिग बॉस 15’ साठी रेखा यांच्या आवाजातील सुरूवातीचे प्रोमो सुपरहिट झाले होते. यासाठीही त्यांनी कोट्यवधीचे मानधन घेतल्याचे कळते.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511