SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयआयटी प्रवेशासाठी जेईई परीक्षा देण्याची गरज नाही, अशा प्रकारेही मिळू शकतो प्रवेश..!

बारावीनंतर अनेकांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न असतं. त्यातही देशातील टाॅपच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळाला, तर सोन्याहून पिवळे..! मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते, ते जेईई (JEE) परीक्षेला.. या टेस्टमध्ये जो चमकला, त्याचे आयुष्यच उजळले म्हणून समजा..!

इंजिनिअरिंगचे (engineering) स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यावी लागते. सुरवातीला ‘जेईई मेन्स’ (JEE mains) नि नंतर ‘जेईई अडव्हाॅन्स’ (JEE Advance) ही परीक्षा द्यावी लागते. त्यात चांगले मार्क्स मिळाले, की देशातील टॉप इंजिनिअरिंग संस्थेत, अर्थात ‘आयआयटी’ (IIT)मध्ये प्रवेश निश्चित..!

Advertisement

पण थांबा..! ‘आयआयटी’साठी प्रवेश मिळविण्यासाठी ‘जेईई’ हा एकच मार्ग नाही. असे अनेक मार्ग (टेस्ट) आहेत, जेथे चांगले मार्क्स मिळाल्यास तुम्ही सहज ‘आयआयटी’ला प्रवेश घेऊ शकता. याबाबतचा घेतलेला आढावा…

ग्रॅज्यूअट अॅप्टीटूड टेस्ट ऑफ इंजिनिअरिंग (GATE)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC), बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, चेन्नई आणि रुरकी, अशा 7 ‘आयआयटी’द्वारे संयुक्तपणे ‘गेट’ टेस्ट घेतली जाते. ‘आयआयटी’मधून ‘मास्टर्स’ वा ‘पीएच.डी.’ करण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.

Advertisement

‘गेट’ परीक्षेत चांगले मार्क मिळविणारे विद्यार्थी एम.टेक (M.tec), इंटिग्रेटेड एमटेक-पीएचडी आणि इंजिनिअरिंग आणि संबंधित विषयातील ‘पीएचडी’सारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात.

काॅमन अॅडमिशन टेस्ट (CAT)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIMs) त्यांच्या व्यवसाय प्रशासन प्रवेशासाठी मुळात ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाते. पण, ‘आयआयटी’ देखील ‘कॅट स्कोअर’च्या आधारे उमेदवारांना त्यांच्या व्यवस्थापन कार्यक्रमांसाठी प्रवेश देतात.

Advertisement

चाचणीमध्ये तीन विभाग असतात – Verbal Ability आणि Reading Comprehension (VARC), डेटा इंटरप्रिटेशन आणि लॉजिकल रीझनिंग (DILR) आणि क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी (QA).

जाॅईंट अॅडमिशन टेस्ट (JAM)
एमआयएससी, पीएचडी आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा होते. ‘आयआयटी’मध्ये गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितीय सांख्यिकी, भूविज्ञान, जैविक विज्ञान, जैवतंत्रज्ञान या विषयांत टेस्ट होते.

Advertisement

ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार भारतीय विज्ञान संस्था (IISc, बंगळुर), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISERs), राष्ट्रीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (NISER, भुवनेश्वर), राष्ट्रीय संस्था येथे MSc अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी पात्र असतात.

📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511 

Advertisement