केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बीएसएनएलच्या 4 जी नेटवर्कवरून पहिला फोन केल्याची घोषणा केली. मंत्री म्हणाले की, हे नेटवर्क भारतातच बनवले गेलेय आणि डिझाइन केले गेलेय. सरकारच्या आत्मनिर्भर भारत या धोरणाला चालना देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने पहिलं स्वदेशी 4जी नेटवर्क लाँच केलं आहे.
यासंदर्भात दुरसंचार मंत्री आश्विनी वैष्णव आणि दुरसंचार सचिव यांच्यात चर्चा झाली होती. या नेटवर्कच्या प्रसारासाठी डिसेंबरपर्यंत बीएसएनलचे सीमकार्ड मोफत वाटण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “बीएसएनएल 4G नेटवर्क जे भारतात बनले आहे, त्यावर पहिला कॉल केलाय”, असं म्हटलं आहे.
बीएसएनएल 4Gचे सिमकार्ड मोफत मिळणार
भारतातील खासगी दूरसंचार कंपन्यांशी स्पर्धा सुरू होत असताना भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) सणासुदीला जबरदस्त ऑफर सुरु केली आहे. बीएसएनएलने 4G सिम कार्ड मोफत देण्याच्या ऑफरची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे. लवकरच बीएसएनएलचे 4G नेटवर्क इतर नेटवर्कला स्पर्धा देताना दिसणार आहे. विशेष म्हणजे हे नेटवर्क पहिलं स्वदेशी 4G नेटवर्क असणार आहे. या स्वदेशी सीमकार्डचे जाळे अधिक विस्तृत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी हे Free BSNL 4G Sim Card काही दिवस मोफत वाटण्यात येणार (किंवा ही ऑफर सिम पोर्ट करणाऱ्यांसाठीही असू शकते.) असल्याची घोषणा बीएसएनएलने केली आहे.
100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता
अलीकडेच, केंद्र सरकारने दूरसंचार क्षेत्रात 100% FDI ला मंजुरी दिली आहे. तर दूरसंचार कंपन्यांना स्पेक्ट्रम शुल्क आणि AGR पेमेंटवर 4 वर्षांचा मोरॅटोरियम देण्याचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की,’दूरसंचार क्षेत्राच्या ऑटोमॅटिक रूटमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली गेली आहे.
बीएसएनएल कंपनी भारतीय दुरसंचार उपकरण बनविण्यासाठी चंदीगडमध्ये टाटा कन्सलटन्सी सर्विसेज आणि राज्याकडून चालविण्यात आलेलं रिसर्च ऑर्गनायझेशनसोबत मिळून प्रुफ ऑफ कन्सेप्ट म्हणजेच पीओसी तयार करणार आहे. पीओसीचं मुख्य काम हे बीएसएनएलच्या नेटवर्कमध्ये 4G उपकरण बसविणे, उपकरण बसवल्यानंतर त्यांची चाचणी करणेेेे, त्याला उपयोगात आणण्यासाठी काम करणे हे आहे. टीसीएसने चंदीगडमध्ये 5 ठिकाणी 4G रेडिओ उपकरण बसवले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशातील सर्वच उपकरणं व सेवा या स्वदेशी करण्यावर भर दिला जात आहे.
📣 तुम्ही ग्रुप अॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511