SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवरात्रीत पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या सोने-चांदीचा आजचा भाव..

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ऐन नावरात्रीतही कमीच आहे. आज 45,940 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये सोन्याचा दर 45,940 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती.

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 65,900 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Advertisement

सोने-चांदीचा आजचा भाव

▪️ गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,940 रुपये आहे. आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर 46,940 प्रति 10 ग्रॅम आहे.

Advertisement

▪️ पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44,170 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,000 रुपये असेल.

▪️ नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,940 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,940 रुपये इतका असेल.

Advertisement

▪️ चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 659 रुपये (65,900 रुपये प्रति किलो) आहे. कालच्या (ता. 12) आणि आज 11 ऑक्टोबर रोजी दरामध्ये 41 रुपयांचा फरक आहे. या सर्व दरांमध्ये जीएसटी, टीसीएस आणि इतर कोणत्याही करांचा समावेश नाही.

भारतात हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो?

Advertisement

एक गोष्ट येथे आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की, सामान्य सोन्याचे दर व हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या किंमतीत काहीही फरक असणार नाही. तुम्हाला हॉलमार्क केलेल्या सोन्यासाठी कोणीही जास्तीचे शुल्क आकारले जात नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

तुम्ही घेतलेले सोने शुद्ध आहे का?

Advertisement

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध असते पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने किंवा आणखी काही बनविणे शक्य नाही. साधारणपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 तुम्ही ग्रुप अ‍ॅडमिन आहात का? मग मिळवा बातम्या आणि माहिती-मनोरंजनाचा खजिना तुमच्या ग्रुपवर, त्यासाठी पुढील क्रमांकावर मिस कॉल द्या आणि आलेला क्रमांक ग्रुप मध्ये ॲड करा 👉 9700111511

Advertisement